Google Top 100 Most Searched Asians: ‘या’ सेलिब्रिटींना गुगलवर सर्वाधिक केलं जातं सर्च

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद या यादीत आहे. विशेष म्हणजे तिने कियारा अडवाणी आणि कंगना रनौतला या यादीत मागे टाकलं आहे. सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या 100 आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या पाचपैकी 3 जण बीटीएस या बँडमधील सदस्य आहेत.

Jun 30, 2022 | 9:22 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 30, 2022 | 9:22 AM

गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या आशियाई सेलिब्रिटींमध्ये 'बीटीएस' (BTS) या कोरियन पॉप बँडमधील गायक आणि डान्सर किम तेह्युंग (Kim Taehyung) हा अग्रस्थानी आहे. त्याने अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना या यादीत मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे आशियातील सर्वांत हँडसम पुरुषाच्या यादीतही तो पहिल्या स्थानी आहे. तो V (व्ही) या नावानेही ओळखला जातो.

1 / 12
सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये दुसऱ्या स्थानीही बीटीएस या बँडचा सदस्य आहे. जोन जंगकूक (Jeon Jungkook) असं त्याचं नाव असून अप्रतिम डान्स आणि गायकीसाठी तो ओळखला जातो. विशेष म्हणजे सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या 100 आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या पाचपैकी 3 जण बीटीएस या बँडमधील सदस्य आहेत. सात जणांचा हा कोरियन बँड जगभरात प्रसिद्ध आहे.

2 / 12
तिसऱ्या स्थानी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा तपास सध्या सुरू आहे.

3 / 12
चौथ्या स्थानी बीटीएस या बँडचा आणखी एक सदस्य पार्क जिमिन (Park Jimin) आहे. 'विथ यू' हे त्याचं नवीन गाणं चांगलंच गाजलं.

4 / 12
पाचव्या स्थानी दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

5 / 12
ब्लॅकपिंक या प्रसिद्ध कोरियन पॉप बँडमधील गायिका 'लिसा' सहाव्या स्थानी आहे. तिच्या लालिसा या गाण्याने युट्यूबवर नवा विक्रम रचला आहे.

6 / 12
अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या स्थानी आहे. कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. सध्या ती 'टायगर 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

7 / 12
क्रिकेटर विराट कोहली या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. विराट आणि महेंद्रसिंग धोनी हे दोनच भारतीय खेळाडू या यादीत समाविष्ट आहेत.

8 / 12
अभिनेता सलमान खान अकराव्या स्थानी आहे. तर शाहरुख खान बाराव्या क्रमांकावर आहे. सलमानने शाहरुखला या यादीत एका पॉईंटने मागे टाकलं आहे.

9 / 12
नुकतीच आई झालेली अभिनेत्री काजल अग्रवालसुद्धा या यादीत आहे. काजलने समंथा रुथ प्रभू आणि रश्मिका मंदाना या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींना या यादीत मागे टाकलं आहे.

10 / 12
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जून 19 व्या स्थानी आहे. थलपती विजयला अल्लू अर्जुनने मागे टाकलं आहे.

11 / 12
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद या यादीत 57 व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तिने कियारा अडवाणी आणि कंगना रनौतला या यादीत मागे टाकलं आहे.

12 / 12

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें