ओदिशातील सुजित दिगल याची रिक्षा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Rohit Dhamnaskar | Edited By: |
Updated on: Oct 13, 2020 | 4:24 PM
Share
ओदिशातील सुजित दिगल याची रिक्षा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
1 / 7
सुजित यांनी आपल्या या रिक्षेचे रुपांतर लहानशा गार्डनमध्ये केले आहे.
2 / 7
अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या सजावटीमुळे सुजित दिगल यांची ही रिक्षा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
3 / 7
रिक्षेतील या गार्डनमध्ये लहान रोपं, छोटासा फिश टँक, पक्ष्यांचे पिंजरे आणि ससे पाहायला मिळतात.
4 / 7
मी लहानशा गावातून शहरात आलो आहे. इतक्या मोठ्या शहरात माझी घुसमट होते. मला गावची सारखी आठवण यायची. यामधून आपल्याला रिक्षेत गार्डन तयार करण्याची संकल्पन सुचल्याचे सुजित यांनी सांगितले.
5 / 7
रिक्षेतील या मिनी गार्डनमध्ये सुजित यांनी एक ससाही ठेवला आहे.
6 / 7
विशेष म्हणजे त्यांची ही रिक्षा केवळ शोभेसाठी नसून मिनी गार्डनसह ती रस्त्यावरही धावते.