AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाएट करताना दिवसातून किती चपात्या खाव्यात? 10-90 चा नियम काय सांगतो?

वजन कमी करण्याच्या नादात चपाती खाणे पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वजन कमी करताना दिवसातून किती चपात्या खाव्यात आणि प्रथिनांचे प्रमाण किती असावे, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेला विशेष सल्ला या लेखात वाचा.

| Updated on: May 09, 2026 | 1:42 PM
Share
भारतीय जेवणात चपाती, पोळी किंवा रोटी हा मुख्य आधार मानला जातो. मात्र, जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो, तेव्हा सर्वात आधी चपाती खाऊ नका असेच सांगितले जाते. अनेकजण कार्ब्स कमी करण्याच्या नादात चपाती खाणे पूर्णपणे बंद करतात. पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? वजन कमी करताना नेमक्या किती चपात्या खाव्यात, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

1 / 8
अनेकांना वाटते की चपाती सोडल्याने वजन झपाट्याने कमी होईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते चपाती पूर्णपणे बंद करणे चुकीचे आहे. गहू, बाजरी किंवा नाचणी यांसारख्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्यांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. हे घटक तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.

2 / 8
जयपूर येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात चपात्या एकदम बंद न करता ते हळूहळू कमी करावे. जर तुम्ही सध्या ३ चपात्या खात असाल तर काही दिवस २ चपात्या खा आणि त्यानंतर हळूहळू एका चपातीवर या.

3 / 8
तुमच्या एकूण आहाराच्या तुलनेत रोट्यांचे प्रमाण केवळ १० टक्के असावे. उर्वरित ९० टक्के आहारात सॅलड, पालेभाज्या, डाळी आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा. केवळ चपात्या कमी करून चालणार नाही, तर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळणेही गरजेचे आहे.

4 / 8
प्रथिनांमुळे स्नायूंची निर्मिती होते आणि चरबी जाळण्यास मदत होते. तुमच्या वजनाच्या प्रति किलोमागे १.२ ते १.५ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. जे लोक जिम किंवा वेट ट्रेनिंग करतात, त्यांनी प्रति किलो १.६ ते २.२ ग्रॅम प्रथिने घेणे अपेक्षित आहे.

5 / 8
रात्रीच्या जेवणात चपात्यांचे प्रमाण कमी ठेवा. तसेच झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा. केवळ गव्हाच्या चपाती खाण्याऐवजी मल्टिग्रेन किंवा ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्या.

6 / 8
रोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. थोडक्यात सांगायचे तर, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा योग्य प्रमाणात खाणे हा सर्वात बेस्ट पर्याय आहे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....