काळवंडलेले कोपर आणि मान यांच्यामुळे आपली त्वचा चांगली दिसत नाही. तेथील काळपटपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात.
Jan 31, 2023 | 10:38 AM
आपला चेहरा व केस तसेच त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण विशेष काळजी घेतो. पण हाताचे कोपर तसेच मान यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे तेथील त्वचा काळवंडते. माती, धूळ यांच्या संपर्कात आल्याने मान आणि कोपरावर घाण जमा होऊ लागते. ज्यामुळे तेथील त्वचा काळवंडते, काही घरगुती उपायांनी आपण तेथील काळपटपणा दूर करू शकतो.
1 / 5
बेसन व हळद - मान व कोपरांचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही बेसन व हळदीचा पॅक लावू शकता. बेसन हे त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रबप्रमाणे कार्य करते आणि हळदी ही बॅक्टेरिअल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात 4 चमचे बेसनाचे पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे कच्चे दूध घालून , गुठळ्या मोडून चांगली पेस्ट तयार करावी. हा पॅक काळवंडलेल्या भागावर नीट लावून 20 मिनिटे ठेवा व नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल
2 / 5
ओट्स व दही - ओट्स आणि दही हे त्वचेला ओलावा देण्यात मदत करतात. याची पेस्ट टॅनिंग काढण्यासाठी उत्तम मानली जाते. यासाठी 4 चमचे दही घेऊन त्यात 2 चमचे ओट्स घाला. हे मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावून 10 मिनिटे मसाज करा किंवा 20 मिनिटे प्रभावित भागावर लावून ठेवा. नियमितपणे हा उपाय केल्यास काळपटपणा दूर होऊन त्वचा पूर्ववत होण्यास मदत होईल.
3 / 5
बेकिंग सोडा - बेकिंग सोडा हा एक्सफोलिएशनसाठी मदत करतोच पण त्यामुळे त्वचेचा काळसरपणा दूर होण्यासही मदत होते. मान व कोपरांचा काळपटपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि प्रभावित भागावर लावून मसाज करावा.
4 / 5
ॲपल सायडर व्हिनेगर - त्वचेची पीएच पातळी संतुलित राखण्यास ॲपल सायडर व्हिनेगर मदत करते. त्यामध्ये असलेले मेलिक ॲसिड डार्क स्किन रिमूव्ह करण्यास मदत करते. त्यासाठी 3 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर 4 चमचे पाण्यात मिसळून घ्या. हे मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावून मसाज करा व 15 मिनिटे तसेच राहू द्या. नियमित वापराने फरक दिसून येईल.