ह्युंदाय इंडिया फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. (Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees on cars)
Mar 24, 2021 | 9:31 AM
या सीएनजी गाड्यांवर मिळतेय बंपर सूट, ह्युंडाई ते मारुती वाहनांचा समावेश
1 / 5
Hyundai Grand i10 Nios वर 60,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. 5.19 लाख ते 8.41 लाख रुपयांदरम्यानच्या किंमतीत (एक्स-शोरूम, दिल्ली) ही कार उपलब्ध आहे, Hyundai Grand i10 Nios ची बाजारात मारुती सुझुकी स्विफ्टशी स्पर्धा सुरु आहे.
2 / 5
ह्युंदाई ऑरा या कारवर 70,000 रुपयांपर्यंत लाभ मिळत आहे. ही कार 5.92 लाख रुपये ते 9.30 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांदरम्यानच्या किंमतीत उपलब्ध आहे. या कारच्या सेगमेंटमध्ये ऑराची मारुती सुझुकी डिझायर आणि होंडा अमेझ या कार्सची स्पर्धा सुरु असते.
3 / 5
ह्युंदाय मोटर इंडिया Elantra कारवर 1 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. या कारची किंमत 17.83 लाख रुपयांपासून ते 21.10 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. ह्युंदाय Elantra चा सध्या मार्केटमध्ये कोणताही थेट प्रतिस्पर्धी नाही.
4 / 5
ह्युंदाय कोना इलेक्ट्रिकवर 1.50 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेता येईल. कोना इलेक्ट्रिकची किंमत 23.76 लाख ते 23.95 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही कार एमजी झेडएस ईव्हीशी स्पर्धा करते.