AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डब्ब्यात की फ्रीजमध्ये, गूळ ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती? गृहिणींनो तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले

गूळ योग्यप्रकारे साठवणे महत्त्वाचे आहे, मात्र तो फ्रीजमध्ये ठेवावा की नाही, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. तज्ज्ञांनुसार, गूळ फ्रीजमध्ये ठेवल्यास कडक होतो आणि आर्द्रता शोषून चिकट होऊ शकतो. यामुळे बुरशीचा धोका वाढतो. थंड, कोरड्या जागी साठवणे उत्तम,

| Updated on: Dec 10, 2025 | 12:06 PM
Share
भारतीय स्वयंपाकघरात गुळाचा वापर भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. नैसर्गिक गोडवा देणारा आणि आरोग्यासाठी उत्तम मानला जाणारा गूळ नक्की कसा साठवावा, याबद्दल गृहिणींमध्ये नेहमीच संभ्रम असतो.

1 / 8
काही गृहिणी गूळ फ्रिजमध्ये ठेवतात. तर काही जणी तो बाहेरच एखाद्या डब्ब्यात ठेवतात. त्यामुळे अनेकांना गूळ नक्की कुठे ठेवावा, असा प्रश्न पडलेला असतो. तसेच गूळ फ्रीजमध्ये ठेवावा की नाही असे देखील वारंवार विचारले जाते.

2 / 8
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही गूळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, मात्र तो ठेवल्यास त्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो. फ्रीजमधील थंड तापमानामुळे गुळातील नैसर्गिक घटक एकत्र येतात आणि गूळ कडक होतो.

3 / 8
थंड तापमानामुळे गुळाचा पोत बदलतो. गूळ कडक झाल्याने तो कापायला किंवा किसण्यास जास्त कष्ट लागतात. त्यामुळे त्याचा वापर करण्यापूर्वी तो रुम टेम्प्रेचरवर आणणे आवश्यक असते.

4 / 8
गूळ फ्रीजमध्ये ठेवल्यास उद्भवणारी दुसरी मोठी समस्या म्हणजे आर्द्रता शोषण (Moisture Absorption). आपण फ्रीज वारंवार उघडतो. यामुळे तापमानात बदल होऊन घनीभवन (Condensation) होते. त्यामुळे गूळ व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवावा.

5 / 8
गूळ आर्द्रता शोषून घेतल्यास तो चिकट आणि ओलसर बनतो. दीर्घकाळ ओलावा राहिल्यास त्यावर बुरशी येण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे गूळ खाण्यासाठी अयोग्य ठरतो. सामान्यतः, गूळ थंड, कोरड्या आणि गडद ठिकाणी ठेवणे सर्वात चांगले मानले जाते. पावसाळ्यात किंवा अति दमट हवामानात गूळ वितळू लागतो.

6 / 8
काही वेळेला तो चिकट होतो. अशा वेळी, त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याला हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवणे सुरक्षित असते. जर तुम्ही गूळ मोठ्या प्रमाणात विकत घेतला असेल आणि तो 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ साठवायचा असेल, तर थंड वातावरण त्याला अधिक काळ टिकण्यास मदत करते.

7 / 8
पण गृहिणींनी गूळ फ्रीजमध्ये ठेवताना तो नेहमी हवाबंद डब्यात ठेवावा. गुळाला प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून मग डब्यात ठेवल्यास ओलावा शोषून घेण्याचा धोका कमी होतो. एकंदरीत, गूळ फ्रीजमध्ये ठेवता येतो, परंतु कडकपणा आणि आर्द्रता या दोन गोष्टी टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

8 / 8
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.