AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sperm Count : घट्ट कपड्यांमुळे भविष्यातील योजनांमध्ये अडथळा?, टाईट कपड्यांनी स्पर्म काऊंट कमी होतो का ?

Sperm Count : घट्ट कपडे घालणे हे फक्त फॅशनपुरते मर्यादित नाही. त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि भविष्यातील योजनांवर थेट परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम पुरुषांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. याबद्दल तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

| Updated on: Aug 04, 2025 | 12:24 PM
Share
खूप घट्ट कपडे हे शुक्राणूंची संख्या अर्थात स्पर्म काऊंट कमी करतात. आजकाल फॅशनच्या युगात घट्ट कपडे घालणे हा एक ट्रेंड बनला आहे. विशेषतः तरुण मुलांना, अनेकदा घट्ट जीन्स किंवा अंडरगारमेंट घालायला आवडतात. कारण त्यांना स्टायलिश दिसायचे असते. पण या घट्ट कपड्यांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? घट्ट कपड्यांमुळे फक्त चालण्यात अडचण येते का की तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो?

1 / 8
अनेक पुरुषांना हे कळत नाही की त्यांच्या कपडे घालण्याच्या सवयी या, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम करू शकतात. वैद्यकीय संशोधनातून असे दिसून आले आहे की घट्ट कपडे घालल्याने शरीराचे तापमान वाढू शकते, विशेषतः अंडकोषांभोवती.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शरीराच्या तापमानात थोडीशी वाढ झाल्याने काय फरक पडतो? तर हे समजून घेणं गरजेचं आहे की,  शुक्राणू निर्मितीची योग्य प्रक्रिया तेव्हाच होते जेव्हा अंडकोषांचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडे कमी असते.

2 / 8
शुक्राणू किंवा स्पर्म अतिशय संवेदनशील असतात. ते सामान्य तापमानातच योग्यरित्या तयार होते आणि वाढतात. परंतु जेव्हा एखादा पुरूष वारंवार घट्ट अंडरवेअर, जीन्स किंवा पँट घालतो तेव्हा ते शरीराला चिकटते आणि उष्णता बाहेर पडू देत नाही. यामुळे अंडकोषांचे तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंच्या, स्पर्मच्या निर्मितीची प्रक्रिया मंदावते.

3 / 8
ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, जे पुरुष नियमित फिट किंवा सैल फिटिंग अंडरवेअर घालतात, त्यांच्यात घट्ट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा शुक्राणूंची संख्या जास्त असते. तसेच, हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून असेही दिसून आले आहे की घट्ट अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंची संख्या 25 टक्क्यांनी कमी होते.

4 / 8
दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे डॉ. अजित कुमार म्हणतात की, या विषयावर अद्याप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेले नाही. शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे प्रमुख घटक आहेत. याशिवाय, अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ - लॅपटॉप सतत मांडीवर ठेवून काम करणे, कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणे उष्णतेचे किरण उत्सर्जित करतात ज्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच, पँटच्या खिशात मोबाईल फोन ठेवल्यानेही शुक्राणूंच्या आरोग्याला हानी पोहोचते.

5 / 8
पुरुषांचे अंडकोष शरीराच्या इतर भागांपेक्षा थंड वातावरणात राहण्यासाठी डिझाइन केलेले असतात, म्हणूनच ते शरीराच्या बाहेर असतात, आत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही घट्ट कपडे किंवा घट्ट अंडरवेअर घालता तेव्हा अंडकोष शरीराच्या जवळ येतात. ज्यामुळे शरीराच्या तापमानामुळे त्यांची उष्णता वाढते, आणि शुक्राणूंच्या आरोग्याला हानी पोहोचते.

6 / 8
निरोगी प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी टिप्स : तुमचा फोन तुमच्या पँटच्या खिशात ठेवू नका. तुमचे खासगी भाग व्यवस्थित स्वच्छ करा. रोजच्या रोज व्यायाम करायला विसरू नका. जर तुम्हाला ड्रग्जचे व्यसन असेल तर ते ताबडतोब सोडून द्या. दररोज दारू प्यायल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. श्वास घेण्यायोग्य कापडापासून बनवलेले अंतर्वस्त्रे किंवा बॉटम घाला. अंडी, बेरी, काजू असे संतुलित आहार घ्या, ताजी फळे आणि भाज्या खा.

7 / 8
जर तुम्हाला प्रजनन क्षमता किंवा कुटुंब नियोजनाबद्दल काळजी वाटत असेल, तर विशेषतः रात्री झोपताना सैल आणि आरामदायी कपडे घालणे चांगले. हलके सुती कपडे, सैल-फिटिंग अंडरवेअर घालून आणि घट्ट जीन्स टाळून तुम्ही तुमची प्रजनन क्षमता सुधारू शकता. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.