लिव्हरपूलने लेपझिगला 2-0 ने पराभूत करुन यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युवेंट्सचं आव्हान संपुष्टात आले आहे.
1 / 4
एका वृत्तसंस्थेनुसार, लिव्हरपूलने सामन्यादरम्यान गोल करण्याची संधी गमावली. पण दुसऱ्या हाफमध्ये काही मिनिटांमध्ये 2 गोल लगावले. यासह लिव्हरपूलने विजय प्राप्त केला. उभयसंघ पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात अपयशी ठरले.
2 / 4
यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. लिव्हरपूलकडून मोहम्मद सालेहने 70 व्या मिनिटाला गोल केला. यानंतर 74 व्या मिनिटाला लिव्हरपूलकडून सादिओ मानेने एक गोल केला. यामुळे 2-0 ने आघाडी घेतली. यासह त्याने संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.
3 / 4
निर्धारित वेळेत लेपझिगकडून कोणालाही एक गोल करता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलचा दणदणीत विजय झाला.