AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर अशोक खरात परदेशात पळून गेला असता? सरकारचा एक निर्णय आणि… नेमकं काय केलं? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं

कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण सध्या चांगलेच पेटले आहे. या भोंदूबाबा बाबत रोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे अशोक खरातला परदेशात पळून जाता आले नाही. आता तो निर्णय काय होता वाचा...

| Updated on: Mar 24, 2026 | 5:34 PM
Share
राज्यात अशोक खरात हे प्रकरण सध्या चांगलेच पेटले आहे. लिंगपिसाट अशोक खरातने घटस्फोटीत महिला, गर्भवती, अल्पवयीन तरुणी, विवाहित महिला यांना देवाची भीती दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले. काहींवर त्याने बलात्कार केला. एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर अशोक खरातचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. काही फोटोंमध्ये त्याचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. आता या प्रकरणावर मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 6
विधानसभेत विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अशोक खरातच्या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. विरोधी पक्षाच्या वतीने हा विषय प्रथमच उपस्थित करण्यात आला असून, त्यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि यात अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची व शक्तीचा दुरुपयोग केला आहे.

2 / 6
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या व्यक्तींच्या समोर रेकॉर्डिंग काढणे सुरू आहे. जी घटना घडली ती खूप गंभीर आहे. आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला गेला आहे.” त्यांनी पोलिसांनी या संदर्भात कारवाई सुरू केल्याचे सांगितले. “पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. एका तक्रारीच्या आधारावर लोक आउट सर्क्युलर (LOC) काढण्यात आला होता, जेणेकरून संबंधित व्यक्ती देशाबाहेर पळून जाऊ नये,” असे त्यांनी सांगितले.

3 / 6
या प्रकरणात महिलांचा सहभाग असल्याने सुरुवातीला अनेक महिला समोर येण्यास तयार नव्हत्या, असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. “महिला सहभागी असल्याने त्या महिला समोर यायला तयार नव्हत्या. तरीही काही महिलांनी तक्रार केली आहे आणि काही महिला लवकरच तक्रार करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. कारवाई आता दिसत असली तरी त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, असेही त्यांनी सांगितले. “कारवाई आता झाली असली तरी तयारी आधीच सुरू होती. तपास अजूनही सुरू आहे,” असे ते म्हणाले.

4 / 6
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळणार नाही, यावर विशेष भर दिला. “मी नेहमी क्लीन चिट देत नाही. क्लीन असेल त्यांनाच चिट देतो. यात दूरचा संबंध असेल त्यांनाही सोडले जाणार नाही,” असे त्यांचे स्पष्ट मत होते. उद्या या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर निवेदन देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “मी उद्या सविस्तर यावर निवेदन करणार आहे,” असे ते म्हणाले.

5 / 6
या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाच्या आरोपांना मुख्यमंत्री यांनी प्रत्युत्तर दिले असून, सरकारने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे दिसून येते. तपास सुरू असल्याने अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोणालाही राजकीय संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?