PHOTO : राज्यातील लॉकडाऊन विरोधात खासदार उदयराजे भोसलेंनी हाती कटोरा घेतला!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोध दर्शवलाय. उदयनराजेंनी आज हाती कटोरा घेट भिक मागो आंदोलन केलं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:39 PM, 10 Apr 2021
1/9
राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्या सरकारने कठोर निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन लागू केलाय. तसंच राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचाही सरकारचा विचार असल्याचं कळतंय. मात्र, लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोध दर्शवला आहे.
2/9
राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन विरोधात उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. उदयनराजे यांनी हातात कटोरा घेत भिक मांगो आंदोलन केलं.
3/9
राज्यातील गोरगरीब जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. छोटे व्यापारी, व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. अशावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केल्यानं ते देशोधडीला लागतील, असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलंय.
4/9
लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात उदयनराजेंनी हातात कटोरा घेत रस्त्यावर फिरुन भिक मागो आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेही उपस्थित होते.
5/9
पुढे पोवई नाक्यावरील फुटपाथवर एका झाडाखाली बसून उदनयराजेंनी आंदोलन केलं. तेव्हा काही जणांना त्यांनी कटोऱ्यात पैसे टाकण्यासही सांगितलं.
6/9
लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. व्यवसायच झाला नाही तर व्यापारी वर्ग कामगारांचा पगार कसा देणार? असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय.
7/9
तसंच सणासुदीचे दिवस असल्यानं व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला. आता दुकानंच बंद ठेवली तर व्यवसाय कसा होणार? व्यापारी बँकांचे हप्ते कसे भरणार? असंही उदनयराजेंनी विचारलंय.
8/9
लॉकडाऊनमुळे लोकांना उपाशी मारण्यापेक्षा कामगारांचं लसीकरण करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
9/9
तसंच लॉकडाऊन होणार नाही, व्यापारी दुकानं उघडतीलच, असा इशाराही उदनयराजेंनी सरकारला दिलाय.