Makar Sankranti 2021 | स्वादिष्टच नाही तर आरोग्यवर्धकही, मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा ‘हे’ पदार्थ!

मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ म्हणत तिळाचे लाडू वाटले जातात.

1/7
मकर संक्रांतीचा उत्सव देशभरात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ म्हणत तिळाचे लाडू वाटले जातात. या सणाच्या निमित्ताने देशभरातील विविध भागात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.
2/7
तीळगुळाचे लाडू : मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळ आणि तीळ मिसळून बरेच पदार्थ बनवले जातात. तिळगुळाचे लाडू हे त्यापैकीच एक. हे लाडू बनवण्यासाठी गुळामध्ये तीळ आणि शेंगदाणा घालून लाडू वळले जातात. आपणास हवे असल्यास आपण त्यात काजू, मनुका, बदाम देखील घालू शकता.
3/7
खिचडी : मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. देशात वेगवेगळ्या प्रकारे खिचडी बनवली जाते. तांदूळ, मूग डाळ, शुद्ध तूप आणि हिरव्या भाज्या एकत्र करून स्वादिष्ट खिचडी बनवू शकता. त्याच्या वर दही टाकून खाऊ शकता.
4/7
चिक्की : मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळ आणि तीळ मिसळून चिक्की बनवू शकता. चिक्की गोड तर आहेच, परंतु आपले शरीर उबदार ठेवण्यास देखील फायदेशीर आहे.
5/7
गुळ तांदूळ भात : या दिवशी तांदूळ आणि गुळाची खीर बनवण्याची परंपरा आहे. या तांदळाच्या खिरीत साखरेऐवजी गूळ वापरला जातो.
6/7
दही पोहे : बिहारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दही पोहे खाल्ले जातात. दह्यामध्ये पोहे आणि कुरमुरे, गुळ घालून हा पदार्थ बनवला जातो.
7/7
गजक : गजक हे गुळापासून बनवलेले एक मधुर मिष्टान्न आहे. तीळ, शेंगदाणा, तूप आणि गुळ एकत्र करुन गजक बनवले जाते. चविष्ट गजक हा चिक्कीचा एक प्रकार असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.