AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir Flag: राम मंदिरावर डौलाने फडकणार राम ध्वज, काय आहे या धर्मध्वजाची वैशिष्ट्ये?

Ram Dhwajarohan Sohala: आयोध्या पुन्हा एकदा सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात राम मंदिरावर धर्मध्वज डौलात फडकेल. काय आहे या धर्मध्वजाची वैशिष्ट्ये? मंदिराच्या शिखरावर ही धर्मपताका कशाचा संदेश देईल ते एका क्लिकवर जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2025 | 11:03 AM
Share
Ayodhya Ram Temple Flag: आयोध्या आज पुन्हा सजली आहे. आयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आज मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा डौलात फडकणार आहे. धर्मध्वजारोहणाचा सोहळा आज होत आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण होईल.

1 / 7
भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानावर अयोध्येत विराजमान आहेत. ही ध्वजा जगभरातील श्रद्धाळू, राम भक्तांसाठी एक संदेश आहे की, आता रामलल्लांचे भव्य मंदिर पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाचा संदेश ही धर्म पताका देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन तर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती.

2 / 7
आज दुपारी जवळपास 12 वाजता श्री राम लल्लाच्या पवित्र मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाच्या ध्वाजे विधिवत आरोहण करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होईल. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचा आयोध्येत रोड शो झाला. त्यावेळी नागरिकांची दुतर्फा मोठी गर्दी दिसून आली.

3 / 7
स्थानिक संतांनुसार, रघुवंशात ध्वजाची मोठी परंपरा राहिलेली आहे. भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष याला काही जण कांचन, रक्त कांचन, देवकांचन, वनराज, रक्तपुष्प असेही म्हणतात, हा वृक्ष प्रतिक म्हणून या ध्वजावर दिसेल. या वृक्षाला जांभळी फुलं येतात.

4 / 7
या ध्वजावर तीन प्रतिकं आहेत. त्यात सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. या केशरी रंगाचा ध्वज कित्येक किलोमीटर दुरूनच दृष्टीपथास पडेल. ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान घंटानादाने आयोध्यानगरीत भक्तीची स्पंदनं उसळेल.

5 / 7
राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही 191 फूट असेल. यामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे. हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रूंद असेल. या ध्वजाचे वजन हे 2 ते 3 किलोग्रॅम असेल. 161 फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे. यासाठी 360 कोनातून फिरणारा बॉल-बिअरिंगचा वापर होईल.

6 / 7
हा ध्वज हाताने शिवून तयार होण्यासाठी 25 दिवस लागले. हा ध्वज एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन आणि रेशमपासून तयार करण्यात आला आहे. पॅराशूट ग्रेड नायलॉनमध्ये सिल्क सॅटिनच्या धाग्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलाचा त्यावर लागलीच परिणाम होणार नाही.

7 / 7
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.