Om Puri Birth Anniversary : चहा विकला, धाब्यावर काम केलं, पुढे अभिनेता होऊन लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य!

तीन दशकांपासून बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हरहूनरी आभिनेता म्हणजे ओम पूरी. ओम पूरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये पंजाबमधील अंबाला येथे झाला.

1/5
तीन दशकांपासून बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हरहूनरी आभिनेता म्हणजे ओम पूरी.  ओम पूरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये पंजाबमधील अंबाला येथे झाला. ओम पूरी यांनी केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली.

2/5
ओम पूरी यांच्या जन्माविषयी त्यांच्या कुटूंबाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती. त्यावेळी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं, दसरा झाल्यानंतर दोन दिवसांनी तुझा जन्म झाला होता. ओम पूरी यांची शाळेतील जन्मतारीख ही 9 मार्च 1950 अशी होती. जेव्हा ओम हे कामानिमित्तानं मुंबईत आले तेव्हा त्यांनी आपली जन्मतारीख बदलून ती 18 ऑक्टोबर 1950 अशी केली.

3/5
 वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी एका चहावाल्याकडे कामाला सुरुवात केली. त्यानंतर ते काही काळ एका ढाब्यावरही कामाला होते. त्यांचा हा संघर्ष शेवटपर्यत सुरु होता. 1973 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि तिथे अभिनयाचे धडे घेतले.  कालांतरानं पूरी यांनी पुण्यातील एफटीआयआयमध्येही प्रवेश घेत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

4/5
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टि्युट ऑफ इंडियामध्ये जेव्हा त्यांची मुलाखत झाली तेव्हा त्यांना प्रवेश देण्यास नकार मिळाला होता. त्याचे कारण त्यांचं दिसणं हे हिरोसारखं नव्हतं. तु हिरोसारखा आणि व्हिलनसारखाही दिसत नाही. असे त्यांना सांगण्यात आले होते. तेव्हा गिरीश कार्नाड हे एफटीआयआयचे संचालक होते. त्यांनी ओम पूरी यांना प्रवेश दिला होता.तेव्हा ओम पूरी यांच्यासमवेत प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हि़ड धवनही होते. ते एकाच रुममध्ये राहत असे.

5/5
दरम्यान वेगवेगळ्या चित्रपट संस्थांमध्ये शिकत असताना त्यांना अनेक जीवलग मित्र मिळाले. त्यात नसरुद्दीन शहा, अमरीश पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील, यांचा समावेश आहे.6 जानेवारी 2017 रोजी या अवलीयाने जगाचा निरोप घेतला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI