Marathi News » Photo gallery » PM Modi in Varanasi PM Narendra Modi participates in Ganga Aarti on Dashaswamedh Ghat
PM Modi in Varanasi : पंतप्रधान मोदींनी क्रूझवर स्वार होत पाहिली ‘गंगा आरती’, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. सोमवारी संध्याकाळी ते दशाश्वमेध घाट इथं पोहोचले आणि गंगा आरतीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी क्रुझवरुन ही आरती पाहिली. यावेळी त्यांनी हात जोडून गंगेला प्रमाण केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ते दशाश्वमेध घाट इथं पोहोचले आणि गंगा आरतीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी क्रुझवरुन ही आरती पाहिली. यावेळी त्यांनी हात जोडून गंगेला प्रमाण केला.
1 / 5
पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये विवेकानंद क्रूझवर सवार झाले होते. इथे आज शिव दीपोत्सव साजरा केला जात आहे. आरतीसोबतच लेझर शो देखील झाला. चारही बाजूला दिव्यांचा प्रकाश पाहायला मिळत होता.
2 / 5
गंगा आरती 21 देव कन्या आणि 9 अर्चकांनी केली. त्यासह घाटावर तब्बल 11 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण घाट दिव्यांच्या उजेडात अधिक आकर्षक दिसत होता.
3 / 5
पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले की, काशीची गंगा आरती कायम अंतर्माला ऊर्जा देते. आज काशीचे मोठे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीमध्ये सहभागी झालो आणि गंगामाईच्या कृपादृष्टीसाठी नमन केलं. 'नमामि गंगे तव पाद पंकजम्'
4 / 5
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नडड्डा, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एक फोटोही काढला. या सर्वांनी आज संध्याकाळी घाटावर गंगा आरती आणि लेझर लाईट आणि साऊंड शो पाहिला.