Marathi News » Photo gallery » Political photos » Demonstration of Nawab Malik's activists outside the ED office as ed took action aginst nawab malik at his home early morning today
Photo | नवाब मलिक यांच्या समर्थनात कार्यकर्ते मैदानात! ED कार्यालयाबाहेर निदर्शनं, जोरदार घोषणाबाजी
Nawab Malik ED inquiry : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी बुधवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवरुन नवाब मलिकांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईवरुन तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
1 / 5
नवाब मलिक यांच्या घरी बुधवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
2 / 5
आमचे नवाब मलिक चांगली काम करतात, त्यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
3 / 5
नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, जिंदाबाद जिंदाबाद, अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
4 / 5
ईडी कार्यालयासमोर नवाब मलिक यांच्या समर्थकांनी निदर्शनं करत ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.