राधिका आपटेनं दिली ‘गुड न्यूज’; केवळ व्हिसासाठी लग्न केल्याचा केला होता खुलासा

अभिनेत्री राधिका आपटेचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय. राधिकाने 2012 मध्ये बेनेडिक्टशी लग्न केलं होतं. केवळ व्हिसा मिळवण्यासाठी हे लग्न केल्याचं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

| Updated on: Oct 17, 2024 | 9:06 AM
अभिनेत्री राधिका आपटेनं सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल 2024'मधील फोटो पोस्ट करत राधिकाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये राधिकाचे फोटो क्लिक करण्यात आले असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतोय.

1 / 5
राधिकाच्या आगामी 'सिस्टर मिडनाइट' या चित्रपटाचं युकेमध्ये प्रीमिअर पार पडलं. यावेळी तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. राधिकाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2 / 5
राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलियनिस्ट आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. नॉर्थन इंग्लंडमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हे लग्न केलं होतं. राधिका तिच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर फारशी व्यक्त होत नाही.

3 / 5
'इंडिया टुडे डिजिटल'ला दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं होतं की ती आणि बेनेडिक्ट त्यांच्या लग्नात फोटो क्लिक करायलाच विसरून गेले होते. "जेव्हा मी आणि बेनेडिक्टने 10 वर्षांपूर्वी लग्न केलं, तेव्हा आम्ही फोटो काढायलाच विसरलो होतो. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना बोलावलं, जेवणसुद्धा आम्हीच बनवलं होतं आणि लग्नानंतर एकत्र पार्टी केली. आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये अनेकजण फोटोग्राफर्स असूनही कोणीच आमचे फोटो काढले नाहीत. आम्हीसुद्धा फोटो काढायला विसरून गेलो", असं ती म्हणाली होती.

4 / 5
एका मुलाखतीत राधिका असंही म्हणाली होती की तिने व्हिसा मिळवण्यासाठी बेनेडिक्टशी लग्न केलं होतं. "माझा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही. आम्हा दोघांना एकत्र राहायचं होतं. परंतु व्हिसामुळे अनेक अडचणी येत होत्या. लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं. त्यामुळे आम्ही लग्न केलं", असं ती म्हणाली होती.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.