PHOTO | उजनीत आढळले दुर्मिळ ‘इंडियन स्टार’ जातीचे कासव

कासवांच्या जागतिक तस्करीत पहिला नंबर असलेल्या आणि जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या ‘इंडियन स्टार’ जातीचे हे कासव आहे.

  • नाविद पठाण, टीव्ही 9मराठी, बारामती
  • Published On - 15:45 PM, 4 Dec 2020
उजनीत मासेमारी करणारे विनोद अभिलाल काळे आणि त्याची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रात डिकसळ भागात मासेमारीसाठी गेले होते. यावेळी सूर्य किरणांमध्ये त्यांना एक चमकणारी वस्तू त्यांना दिसली. त्यामुळे मोठ्या कुतुहलाने त्यांनी जवळ जाऊन पाहिले. जवळ जाताच त्यांना आत्तापर्यंत कधीच पाहण्यात नसलेले कासव दिसले. हे 'इंडियन स्टार' जातीचे कासव आहे.
त्यानंतर या दाम्पत्याने भिगवण येथील प्रसिध्द मच्छीमार भरत मल्लाव यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर हे कासव आज वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
कासवांच्या जागतिक तस्करीत पहिला नंबर असलेल्या आणि जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या 'इंडियन स्टार' जातीचे हे कासव आहे. उजनीच्या 40 वर्षाच्या इतिहासात पाहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भिगवण जवळील डिकसळ हे कासव आढळून आले आहेत.
सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव हे दिसायला जास्त सुंदर, असामान्य आणि मनमोहक असतो. त्याच्या बाह्य कवचावर ताऱ्यांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी आकारात ठिपके असतात.
'इंडियन स्टार' जातीचे कासव हे वन्यजीव संरक्षण अधीनियमानुसार संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या तस्करीवर तसेच, हे कासव जवळ बाळगणे, पाळणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सध्या हे कासव वनविभागाकडे सपुर्द कारण्यात आले आहे. यानंतर त्याला त्याच्या मुळअधिवासात सोडण्यात येणार आहे.