AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नावाने हिंदू, धर्माने मुस्लिम! 11 वर्षांनी मोठ्या विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध, क्रिकेटरशी लग्न करुही सुखी नाही

बॉलिवूड अभिनेत्री या कामयच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. कधी त्यांच्या लग्नामुळे तर कधी अफेअर्समुळे. 70 आणि 80 च्या दशकातील एक अभिनेत्री तर अशी होती जिचे विवाहित पुरुषासोबत अफेअर होते. लग्नानंतर ती कधीही सुखी संसार करु शकली नाही. आता ही अभिनेत्री कोण होती? चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 18, 2025 | 4:30 PM
Share
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय ही 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय नायिकांपैकी एक होती. तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम केले. पण 1976 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आलेल्या 'कालिचरण' चित्रपटाने तिचे नशीब बदलले. रीना रॉयचे नशीब त्या एका भूमिकेमुळे चमकले, जी अनेक अभिनेत्रींनी नाकारली होती. 70 आणि 80 च्या दशकात या एका भूमिकेमुळे त्या रातोरात स्टार बनल्या. यानंतर त्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाऊ लागल्या.

1 / 8
रीना यांनी आपल्या अभिनयाने 'जानी दुश्मन', 'नागिन', 'आशा', 'अर्पण', 'नसीब', 'सनम तेरी कसम' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या. करिअर यशाच्या शिखरावर असताना त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांच्याशी विवाह केला.

2 / 8
या विवाहातून त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव जन्नत ठेवण्यात आले. लग्नानंतर रीना यांनी अभिनय विश्वापासून अंतर ठेवले, ज्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले. रीना रॉय यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. फार कमी लोकांना माहित आहे की रीना रॉय यांचे खरे नाव सायरा अली होते.

3 / 8
रीना रॉय यांचे वडील सादिक अली हे मुस्लिम होते आणि आई शारदा राय या हिंदू होत्या. सायरा चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यांचे वडील चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत (जसे की 'बावरे नैना' चित्रपटात दिसले होते).

4 / 8
लहानपणीच आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर सायरा आणि तिच्या भावंडांनी वडिलांपासून अंतर ठेवले. नंतर त्यांच्या आईने त्यांचे नाव बदलून रूपा राय असे ठेवले. पण जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा दिग्दर्शक बी.आर. इशारा यांनी त्यांचे नाव बदलून रीना रॉय असे ठेवले.

5 / 8
70 च्या दशकात रीना रॉय या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री बनल्या होत्या. त्यांचे सहकलाकार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघांची भेट 'कालिचरण' च्या सेटवर झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांना प्रेम झाले. शत्रुघ्न हे 11 वर्षांनी मोठे होते आणि रीना यांच्या आईला हा संबंध मान्य नव्हता.

6 / 8
1981 मध्ये शत्रुघ्न यांनी पूनम सिन्हा यांच्याशी लग्न केले. त्यानंतर रीना यांना समजले की त्या कधीही शत्रुघ्न यांच्या पत्नी होऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांनी शत्रुघ्नपासून अंतर राखले आणि नंतर क्रिकेटर मोहसिन खान यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला जन्नत नावाची मुलगी झाली. पण मोहसिन यांचा जीवनशैली रीना यांना रुचली नाही.

7 / 8
90 च्या दशकाच्या सुरुवातीला दोघांचा घटस्फोट झाला. मोहसिन आपल्या मुलीला घेऊन कराचीला गेले. रीना यांनी अनेक वर्षे मुलीच्या ताब्यासाठी लढा दिला आणि अखेरीस त्यांना जन्नतच्या संगोपनाचा हक्क मिळाला.

8 / 8
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.