IPL 2021 : विराट कोहलीच्या निशाण्यावर हे 5 रेकॉर्ड, मुंबईविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडणार?

बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीजवळ या हंगामात काही रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. | RCB Virat Kohli 5 big records Ipl Season 2021

1/5
Virat Kohli 5 Big Records
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीजवळ या हंगामात काही रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. या मोसमात 8 सामने खेळताच कोहली आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा खेळाडू होईल. आतापर्यंत रोहित शर्मा आणि धोनी 200 हून अधिक आयपीएल सामने खेळले आहेत.
2/5
Virat Kohli 5 Big Records
विराट कोहलीजवळ युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल. ख्रिस गेलच्या नावावर आयपीएल इतिहासात 6 शतकं आहेत तर विराटने आतपर्यंत 5 शतकं ठोकली आहेत. आणखी एक शतक ठोकून विराट गेलच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो.
3/5
Virat Kohli 5 Big Records
आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा विराट कोहली पहिला बॅट्समन बनू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोहलीने 5878 धावा केल्या आहेत. आणखी 122 धावा केल्यावर कोहली हा खास पराक्रम करण्यात यशस्वी होईल.
4/5
Virat Kohli 5 Big Records
विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्यापासून केवळ 269 धावा मागे आहे. या हंगामात तो 10 हजार धावा पूर्ण करु शकतो. विराटने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 9731 धावा केल्या आहेत. जर यंदाच्या हंगामात त्याने 269 धावा केल्या तर कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल.
5/5
Virat Kohli 5 Big Records
50 फिफ्टी प्लस करणारा बॅट्समन म्हणून विराटचा विक्रम होऊ शकतो. जर विराट कोहली आयपीएलच्या 6 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्यास यशस्वी ठरला तर आयपीएलच्या इतिहासात 50 फिफ्टी प्लस करणारा फलंदाज होईल.