Car Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री?

कार बाजारात सेमीकंडक्टर आणि चिपचं संकट मोठा अडसर ठरत आहे. अनेक गाड्यांच्या मॉडेल्सवरही मोठी वेटिंग सुरु आहे. त्यामुळे अनेक बुकुंग कॅन्सल होत आहे. तसंच नव्या बुकिंगही कमी प्रमाणात होत आहेत. दरम्यान, रिपोर्टनुसार या संकटाच्या काळातही कार कंपन्यांनी 2021 मध्ये 30 लाखापेक्षा अधिक कारची विक्री केली आहे.

Jan 29, 2022 | 12:06 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 29, 2022 | 12:06 AM

चिप संकटाच्या सामना करणाऱ्या कार कंपन्यांसाठी डिसेंबर महिना चांगला ठरला. या काळात देशातल कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या कार विक्रीमध्ये वाढ पाहायला मिळाली. मारुती सुझुकीने डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक कार विकल्या. कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 1 लाख 53 हजार 149 कारची विक्री केली. दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या टाटा मोटर्सने 35 हजार 299 गाड्यांची विक्री केली. तर तिसऱ्या नंबरवर राहिली हुंदाई. हुंदाई कंपनीने एकूण 32 हजार 312 युनिट्सची विक्री केली. त्यानंतर होंडाने आपल्या 7 हजार 973 कार विकल्या.

1 / 4
डिसेंबर 2020 मधील आकड्यांची तुलना केल्यास परिणाम आश्चर्यकारक दिसतात. मारुतीने डिसेंबर 2020 मध्ये 1 लाख 60 हजार 226 गाड्यांची विक्री केली होती. त्या हिशेबाने कंपनीच्या 7 हजार 77 गाड्या कमी विकल्या गेल्या आहेत. तर टाटासाठी 2021 मधील डिसेंबर महिना चांगला राहिला. कारण डिसेंबर 2020 मध्ये टाटाच्या 23 हजार 545 गाड्यांची विक्री झाली होती, तर डिसेंबर 2021 टाटाच्या गाड्यांच्या विक्रीत 11 हजार 745 ने वाढ झाली आहे.

2 / 4
हुंदई कंपनीची गोष्ट करायची झाली तर डिसेंबर 2021 त्यांच्यासाठी काही खास राहिला नाही. डिसेंबर 2020 मध्ये हुंदईने 47 हजार 400 कारची विक्री केली. या हिशेबाने डिसेंबर 2021 मध्ये हुंदई कंपनीच्या कारच्या विक्रीत काहीशी घट पाहायला मिळतेय. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने डिसेंबर 2020 मध्ये 8 हजार 638 युनिट विकले होते. त्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये कंपनी काहीशी मागे पडली आहे. टोयोटा कंपनीचा विचार करायचा झाल्यास डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 10 हजार 832 कारची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये कंपनीच्या 7 हजार 487 कारची विक्री झाली होती. या हिशेबानं टोयोटाने आपल्या कारची 45 टक्के अधिक विक्री केली आहे.

3 / 4
कार बाजारात सेमीकंडक्टर आणि चिपचं संकट मोठा अडसर ठरत आहे. अनेक गाड्यांच्या मॉडेल्सवरही मोठी वेटिंग सुरु आहे. त्यामुळे अनेक बुकुंग कॅन्सल होत आहे. तसंच नव्या बुकिंगही कमी प्रमाणात होत आहेत. दरम्यान, रिपोर्टनुसार या संकटाच्या काळातही कार कंपन्यांनी 2021 मध्ये 30 लाखापेक्षा अधिक कारची विक्री केली आहे. 2020 मध्ये हाच आकडा 24 लाखाच्या घरात होता.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें