राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.
1 / 6
शरद पवार यांनी सुरुवातीला आपल्या राजकीय प्रवासाची मांडणी केले. ते म्हणाले की, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो.
2 / 6
मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते.
3 / 6
काँग्रेसचे काम करत असताना इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. त्यावेळी युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड झाली. मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला आम्ही गेलो तेव्हा जपानच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम करायला मिळाले. त्यावेळी जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यलयात काम करण्याची संधी मिळाली.
4 / 6
युनोस्कोचा दौरा सोडून मला परत बोलवले. मला विधानसभेला उभे राहण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये तिकीट मिळाले. निवडणूक सोपी नव्हती. परंतु अनेक वर्षे युवकांच्या चळवळीत काम केले. त्यानंतर विद्यार्थी चळवळीत काम केले. त्याचा फायदा झाला आणि मी निवडून आले.
5 / 6
१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.