‘या’ 7 फीचर्समुळे Skoda Kushaq सर्वात खास ठरते, जाणून घ्या का खरेदी करायला हवी शानदार कार

स्कोडा ऑटो इंडियाने अखेर भारतात स्कोडा कुशक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली आहे. (Skoda Kushaq Compact SUV Global Debut In India)

1/7
स्कोडा ऑटो इंडियाने अखेर भारतात स्कोडा कुशक कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली आहे. ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्ट अंतर्गत विकसित केलेले हे पहिले वाहन आहे. या एसयूव्हीचे 93 टक्के भाग भारतात तयार करण्यात आले आहेत. या एसयूव्हीची किंमत 10 ते 16 लाख रुपयांदरम्यान असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2/7
कुशकचे प्रॉडक्शन-स्पेक एडिशन व्हिजन इन कॉन्सेप्टसारखेच आहे. याच्या अपफ्रंटमध्ये स्कोडा सिग्नेचर-स्टाइल क्रोम-फिनिश ग्रिल आहे आणि LED DRLs द्वारे फ्लँक केले आहेत. ही कार स्पोर्टी 17 इंचाच्या ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, ड्युअल-टोन बम्पर आणि स्कोडा टेलगेटवर लेटरिंगसह येते. तथापि, एसयूव्हीच्या लोअर आणि मीडियम वेरिएंटमध्ये अनुक्रमे 16 इंच स्टीलचे रिम्स आणि 16 इंचांचे अलॉय व्हील्स मिळतील.

3/7
एसयूव्हीची केबिन चांगली संतुलित आणि सुबकपणे ड्युअल टोन पेंट स्कीमसह डिझाइन केली आहे. यात Apple कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस मिररलिंक, हवेशीर फ्रंट सीट्स, मागील बाजूस एसी व्हेंट्स, MID इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्रूझ कंट्रोल, एम्बियंट लायटिंग, सेव्हन-स्पीकर म्युझिक सिस्टम आणि स्टीयरिंग व्हील, ऑटो-डिमिनिंग IRVMs, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, वायरलेस चार्जर, माय स्कोडा कनेक्ट, टू स्पोकसह 10 इंच इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.

4/7
स्कोडा कुशक एसयूव्हीमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 1.0-लीटर थ्री सिलेंडर टीएसआय आणि 1.5 लिटरचे चार सिलेंडर टीएसआय पर्याय देण्यात आले आहेत.

5/7
ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह पर्यायी 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा (1.0-लीटर टीएसआय) आणि 7-स्पीड डीएसजी (1.5-लिटर टीएसआय) समावेश आहे.

6/7
स्कोडा कुशक 6 एअरबॅग, ESC, हिल-होल्ड कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स, ऑटो हेडलॅम्प्स आणि वायपर्स, मल्टी-बंप ब्रेकिंग सिस्टम आणि अनेक सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज आहे.

7/7
Skoda Kushaq एसयूव्हीची लांबी 4,221 मिमी, रुंदी 1,760 मिमी आणि उंची 1,612 मिमी आहे. याचा ग्राउंड क्लीयरन्स 188 मिमी आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कँडी व्हाइट, ब्रिलियंट सिल्व्हर, कार्बन स्टील, हनी ऑरेंज आणि टॉरॅनो रेड या पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI