Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीत तीन संघ पडलेत भारतावर भारी! जाणून घ्या आतापर्यंत काय घडलं ते

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतासह आठ संघ सहभागी झाले आहेत. दोन गटातून चार संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागेल. भारताने आतापर्यंत सहा संघांशी सामना केला आहे. तर एका संघाशी सामना करण्याची वेळ आली नाही. तर तीन संघांशी भारतीय संघ कधीच जिंकलेला नाही. भारताला या संघांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर तीन संघाविरुद्ध कायम विजय मिळवला आहे

| Updated on: Feb 17, 2025 | 9:54 PM
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून  यापैकी तीन संघ टीम इंडियाला भारी पडले आहेत. दुसरीकडे, उरलेले चार संघ भारताविरुद्ध कधीच जिंकलेले नाहीत. चला जाणून घेऊयात भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणी आणि कशी मात दिली ते...

1 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया आणि भारत चार वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा विजय मिळवला आहे. तर भारताने एकदा ऑस्ट्रेलिया मात दिली आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे.

2 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचं पारडं जड आहे. दोन्ही संघ आतापर्यंत पाचवेळा भिडले आहेत. भारताने दोन, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. 23 फेब्रुवारीला हे दोन संघ सहाव्यांदा भिडणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचं पारडं जड आहे. दोन्ही संघ आतापर्यंत पाचवेळा भिडले आहेत. भारताने दोन, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. 23 फेब्रुवारीला हे दोन संघ सहाव्यांदा भिडणार आहेत.

3 / 6
न्यूझीलंड आणि भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत एकदाच समोरासमोर आले आहेत. 2000 साली म्हणजेच आजपासून 25 वर्षांपूर्वी अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा न्यूझीलंडने भारताला पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता हे संघ दुसऱ्यांदा 2 मार्चला साखळी फेरीत भिडणार आहे. हा सामना दुबईत होईल.

4 / 6
भारताविरुद्ध इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश हे संघ कधीच चॅम्पियन्स ट्रॉफीत जिंकलेले नाहीत. इंग्लंडला तीन सामन्यात, दक्षिण अफ्रिकेला चार सामन्यात आणि बांगलादेशला एका सामन्यात पराभूत केलं आहे.

भारताविरुद्ध इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश हे संघ कधीच चॅम्पियन्स ट्रॉफीत जिंकलेले नाहीत. इंग्लंडला तीन सामन्यात, दक्षिण अफ्रिकेला चार सामन्यात आणि बांगलादेशला एका सामन्यात पराभूत केलं आहे.

5 / 6
भारत आणि अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत कधीच आमनेसामने आले नाही. जर अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला नाही तर आताही समोरासमोर येणार नाही. कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे बाद फेरीतच झाला तर सामना होऊ शकतो.

6 / 6
Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.