AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 व्या वर्षी पदार्पण, हॅट्रिकने इतिहास रचला, टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकवून दिला, 28 व्या वर्षी करिअरचा THE END!

Irfan Pathan Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याचा आज वाढदिवस आहे. इरफान पठाणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरची कहाणी आपण थोडक्यात समजून घेऊया.

| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 1:38 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याचा आज वाढदिवस आहे. 27 ऑक्टोबर 1984 रोजी जन्मलेला इरफान वडोदराच्या गल्लीत खेळत खेळत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये कधी पोहोचला, हे अनेकांना कळलं नाही, त्याचं कारण त्याच्याकडे असलेलं चॅलेंट!. एका छोट्याशा शहरातून सुरु झालेला प्रवास भारताच्या प्रमुख गोलंदाजापर्यंत जाऊन पोहोचला. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आपल्या स्विंगच्या जोरावर टीम इंडियात इरफानने स्थान मिळवले. पाकिस्तानमध्ये भारताला त्याने थरारक विजय मिळवून दिला. भारताला T20 विश्वचषक जिंकवून देण्यात इरफानने मोलाचा वाटा उचलला. पण ज्या वयात इतर गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवतात, त्या वयात इरफान पठाण क्रिकेट फॉरमॅटमधून आऊट  झाला. त्याचा फॉर्म गेला, सततच्या दुखापतीमुळे अडचणी वाढल्या. एकेकाळी त्याची तुलना वसीम अक्रम, कपिल देव यांच्याशी केली जात होती पण तरीही त्याला 50 कसोटी सामनेही खेळता आले नाहीत. इरफान पठाणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरची कहाणी आपण समजून घेऊया.

1 / 5
इरफान पठाणने 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इरफानने कसोटी पदार्पण केले. तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. त्याच्या पहिल्या चार विकेट्समध्ये त्याने मॅथ्यू हेडन, स्टीव्ह वॉ, अॅडम गिलख्रिस्ट आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना बाद केले. इरफान पठाणने आपल्या स्विंगद्वारे खूप प्रसिद्धी मिळवली. त्याला स्विंगचा पुढचा सुलतान म्हटले गेले. त्याची तुलना वसीम अक्रमशी करण्यात आली. कपिल देवनंतर भारतातील सर्वात प्रतिभावान स्विंग आणि सीम बॉलर देखील म्हटले गेले. यामागे एक मोठे कारण होते. ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तान दौऱ्यावर त्याने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकून दिली.

2 / 5
इरफान पठाणने जानेवारी 2006 मध्ये इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत पहिल्याच षटकात सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ यांना बाद करून हॅट्ट्रिक मिळवली. यापैकी त्याने मोहम्मद युसूफला ज्या पद्धतीने बाद केले तो अप्रतिम चेंडू होता. पाकिस्तान दौऱ्यावरच, त्याने फैसलाबाद कसोटीत एमएस धोनीसोबत 210 धावांची भागीदारी केली आणि भारताला फॉलोऑनचा टप्पा पार करुन दिला. त्याच्या दिमाखदार खेळीनंतर त्याला भारताचा पुढचा अष्टपैलू खेळाडू म्हटले गेले. तो फलंदाजीत वरच्या क्रमाकांवर येऊ लागला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून अनेक चांगल्या खेळी पाहायला मिळाल्या. पण त्याच्या गोलंदाजीची धार कमी होत गेली स्विंग कमी होत गेला आणि वेगही पूर्वीसारखा राहिला नाही. 2006 च्या अखेरीस तो संघाबाहेर गेला होता.

3 / 5
2006 मध्ये, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी मधूनच, त्याला भारतात पाठवण्यात आले आणि त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले गेले. 2007 च्या विश्वचषकात त्याला स्थान मिळाले पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. या स्पर्धेत भारत पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेनंतर पठाणला वनडे आणि कसोटी संघातून वगळण्यात आले. पण 2007 टी-20 विश्वचषकासाठी त्याला संधी दिली गेली. यामध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या आणि फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 16 धावांत 3 विकेट घेतल्या. तो सामनावीर ठरला. भारताला चॅम्पियन बनवण्यात त्यांने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर वनडे आणि कसोटी संघातही त्याला स्थान मिळाले. 2008 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत त्याने शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पर्थ कसोटीत 28 आणि 46 धावा केल्या, त्यासोबतच पाच विकेट्स घेतल्या आणि तो सामनावीर ठरला.

4 / 5
इरफान पठाणला दुखापतीमुळे आणि फॉर्ममध्ये घसरण झाल्यामुळे संघात आत बाहेर राहावं लागलं. हा ट्रेंड करिअरमध्ये पुढेही कायम राहिला. 2012 मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग असला तरी तो खेळला नव्हता. टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला तेव्हा तो 28 वर्षांचा होता. त्याने 29 कसोटीत 1105 धावा केल्या आणि भारतासाठी 100 बळी घेतले. 120 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1544 धावा करण्यासोबतच त्याने 173 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी त्याने 24 टी-20 सामन्यात 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये इरफान पठाणला खूप डिमांड होती. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पदार्पण केले. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचाही भाग होता. पण पठाण आयपीएलमध्ये फारशी छाप पाडू शकला नाही.सततची दुखापत हे त्याचे एक कारण होते.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.