AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे..रे..! आयसीसी टी20 स्पर्धेत या संघाने लाज काढली, अवघ्या 10 धावात संपूर्ण संघ तंबूत

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आशिया गटात पात्रता फेरी सुरु आहे. या स्पर्धेत टी20 क्रिकेटमधील नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. अवघ्या 10 धावांवर सर्व संघ तंबूत परतला आणि पाच चेंडूत सामन्याचा निकाल लागला. या सामन्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 05, 2024 | 7:15 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीत वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. पात्रता फेरीत आशियाई गटातून मंगोलिया आणि सिंगापूर हे संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेत मंगोलियन संघाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. फक्त 10 धावांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला आहे.

1 / 6
सिंगापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मंगोलिया संघाने 10 षटकांचा सामना केला आणि 10 धावा करून 10 गडी गमावले. सिंगापूर संघासमोर फक्त 11 धावांचं आव्हान दिलं.

सिंगापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मंगोलिया संघाने 10 षटकांचा सामना केला आणि 10 धावा करून 10 गडी गमावले. सिंगापूर संघासमोर फक्त 11 धावांचं आव्हान दिलं.

2 / 6
मंगोलियाने या सामन्यात 10 षटकं खेळली हे विशेष आहे. पण फक्त 10 धावा करत आल्या. त्यामुळे टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

मंगोलियाने या सामन्यात 10 षटकं खेळली हे विशेष आहे. पण फक्त 10 धावा करत आल्या. त्यामुळे टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

3 / 6
यापूर्वी हा विक्रम इस्ले ऑफ मॅन संघाच्या नावावर होता. त्यांनी 8.4 षटकात 10 धावा केल्या आहेत. स्पेनविरुद्ध त्यांनी हा नकोसा विक्रम रचला होता.  तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मंगोलियन संघ आहे. मंगोलियन संघाने 12 आणि 17 धावा केल्या आहेत.

4 / 6
मंगोलियन संघातून पाच खेळाडू आपलं खातंही खोलू शकले नाहीत. तर चार खेळाडू एक या धावसंख्येवर राहिले. तर दोन खेळाडूंनी दोन धावा केल्या. सिंगापूरकडून हर्षा भारद्वाजने 4 षटकात 2 निर्धाव षटकं टाकत 6 गडी बाद केले.

5 / 6
मंगोलियाने दिलेल्या 11 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सिंगापूरने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली. त्यानं विल्यम सिमसन आणि राउल शर्माने एक षटकार आणि 1 चौकार मारून सामना जिंकवला. अवघ्या या 5 चेंडूत हा सामना संपला. टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंत विजयी लक्ष्य गाठलं आहे.

6 / 6
Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील