AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS AUS | टीम इंडियाची बादशाहत धोक्यात, ऑस्ट्रेलिया रोहितसेनेची घोडदौड थांबवणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता हा तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेसह मोठा रेकॉर्ड कायम ठेवण्याची संधी आहे.

| Updated on: Mar 22, 2023 | 5:11 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा खेळवण्यात येत आहे. चेन्नईतील सामना जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक आहे.

1 / 5
टीम इंडियासाठी ही एकदिवसीय मालिका फार महत्वाची आहे.  या मालिकेत टीम इंडियाचं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही संघात वनडे क्रिकेटमधील एक नंबर होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे.  ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियासमोर अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आहे.

2 / 5
टीम इंडियाने मायदेशात अर्थात भारतात आपला दबदबा कायम ठेवला आहे.  टीम इंडियाला कुणीच गेल्या 5 वर्षात भारतात धुळ चारु शकलेला नाही. टीम इडिंयाने गेल्या 5 वर्षात  7 एकदिवसीय मालिका खेळलेल्या आहेत. भारतात झालेल्या सातही सीरिज टीम इंडियाने जिंकल्या आहेत. तर आता टीम इंडियाचं आठव्यांदा सीरिज जिंकण्याकडे लक्ष आहे.

3 / 5
टीम इंडियाला भारतातला अखेरचा एकदिवसीय मालिका पराभव हा 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारावा लागला होता. उभयसंघात 5 सामन्यांची मालिका ही 2-2 ने बरोबरीत होती. मात्र पाचवा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली होती. टीम इंडियाचा हा भारतातला 4 वर्षातला पहिला मालिका पराभव ठरला.

4 / 5
मात्र आता टीम इंडियाला मालिका पराभवाचा धोका आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा आपल्याला पराभूत करावं, असं कोणताही चाहता इच्छिणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

5 / 5
Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ