Marathi News » Photo gallery » Sports photos » Indian Mixed relay teams priya mohan summy bharath and sridhar did so much struggle for winning Bronze in world athletics u 20 championship
U20 WC: भारताला पदक मिळवून देणाऱ्या मिक्स्ड रिले संघाची कहाणी, कोरोनासह दुखापतींतून सावरलेल्या खेळाडूंनी मिळवलं यश
भारताच्या धावपटूंनी अंडर - 20 जागतिक अॅथलेटिक्समध्ये (World Athletics Championship) मिक्स्ड रिले स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. ही कामगिरी करणारा प्रत्येक खेळाडू अडचणींवर मात करुन इथवर आला आहे.
Aug 23, 2021 | 4:42 PM
भारताच्या 4X400 मीटर मिक्स्ड रिले संघाने बुधवारी अंडर - 20 जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदकावर नाव कोरलं. भारतीय संघात भरत एस, प्रिया मोहन, सम्मी आणि कपिल या खेळाडूंचा समावेश होता. त्यामनी 3:20.60 सेकंदाच्या वेळेत शर्यत पार करत तिसऱे
स्थान मिळवले. ज्यामुळे त्यांनी कांस्य पदक खिशात घालत इतिहास रचला. पण या ऐतिहासिक कामिगिरीपूर्वी संघातील खेळाडू हे अनेक अडचणींवर मात करुन इथवर आले होते.
1 / 4
यामध्ये स्पर्धेाधी जूनमध्येच भारत श्रीधर याला कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर मात करुन संघात आल्यावर तो दुखापग्रस्त देखील झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण तरीदेखील त्याने मेहनत करत अखेर अंतिम शर्यतीत अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
2 / 4
संघात असणाऱ्या दोन्ही महिलांना अंतिम शर्यती दिवशीच 400 मीटरच्या आणखी शर्यतीतही सहभाग घ्यावा लागला होता. कारण ज्या दिवशी मिक्स्ड रिले संघाची अंतिम शर्यत होती, त्याच दिवशी महिलांची 400 मीटर शर्यत देखील होती. त्यामुळे एकापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये भाग घेऊनही दोन्ही महिलांनी अंतिम शर्यतीत अप्रतिम कामगिरी केली.
3 / 4
रिले संघातील महिला खेळाडू प्रिया मोहनही चौथ्य स्थानावर होती. तिने दोन महिन्यांआधीच आंतरराज्यीय अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकसाठी तिची निवड होईल अशी चर्चा होती. मात्र तिला संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतरही निराश न होता तिने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.