Marathi News » Photo gallery » Sports photos » Ishant Sharma Took Devon Conway Wicket in ICC WTC Final And got place in indian legends with 200 Test Wicket
WTC Final मध्ये एक विकेट घेताच इशांत दिग्गजांच्या पंगतीत, ‘हा’ खास विक्रम केला नावे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला दुसरं यश मिळवून देणाऱ्या इशांत शर्माने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने भारतीय दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिला विकेट घेताच भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे, भारतीय दिग्गज गोलंदाजाच्या पंगतीत त्याने स्थान मिळवलं आहे. इशांत आधी केवळ तीनच भारतीय गोलंदाज ही कामगिरी करु शकले आहेत.
1 / 5
WTC Final मध्ये डेवन कॉन्वेची विकेट घेताच इशांत परदेशी भूमीत 200 हून अधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. इशांतच्या नावावर एकूण 304 कसोटी विकेट्स झाल्या आहेत.
2 / 5
इशांत आधी ही कामगिरी तिघा भारतीय गोलंदाजानी केली असून या लिस्टमध्ये सर्वात वर नाव अनिल कुंबळेचं असून त्याने परदेशी भूमित 259 कसोटी विकेट्स घेतले आहेत. तर टेस्टमध्ये एकूण 619 विकेट्स कुंबळेच्या नावे आहेत.
3 / 5
कुंबळेनंतर नंबर लागतो भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा. कपिल यांनी परदेशी टेस्टमध्ये 215 विकेट्स घेते आहेत. तर टेस्ट कारकिर्दीत त्यांच्या नावे 434 विकेट्स आहेत.
4 / 5
अनेक वर्ष भारतीय गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या झहिर खानचा नंबर देखील या लिस्टमध्ये लागतो. झहीरने परदेशात 207 विकेट्स घेतले असून एकूण 311 टेस्ट विकेट्स झहीरच्या नावावर आहेत.