Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लखनौ सुपर जायंट्सला स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेला मुकणार!

लखनौ सुपर जायंट्सने जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून मेगा लिलावात खोऱ्याने पैसा ओतला. ऋषभ पंतसाठी सर्वात मोठी रक्कम मोजली तसेच कर्णधारपद सोपवलं. पण संघ मैदानात उतरण्यापूर्वीच फ्रेंचायझीला धक्का बसला आहे. मयंक अग्रवालला 11 कोटी रुपये देऊन कायम ठेवलं होतं. मात्र आता खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

| Updated on: Mar 11, 2025 | 4:44 PM
आयपीएलचं 18वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी कंबर कसली आहे. पण असं असताना या स्पर्धेपूर्वीत दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने फ्रेंचायझींची धाकधूक वाढली आहे. त्यात लखनौ सुपर जायंट्सची गेल्या पर्वात सुरु झालेली चिंता यंदाही दूर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला आयपीएल 2024 स्पर्धेत पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यातून तो काही सावरलेला नाही.

1 / 5
आयपीएल 2024 स्पर्धा त्याला अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दुखापत जाणवू लागल्याने त्याला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत उपचारासाठी पाठवलं गेलं.

2 / 5
मयंक यादवच्या पाठदुखीचा त्रास काही कमी झालेला नाही. आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सत्रात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पहिल्या सात सामन्यात मयंक यादव खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

3 / 5
आयपीएल 2025 स्पर्धा सुरु असताना एनसीएकडून त्याला फिटनेस सर्टीफिकेट मिळालं तर तो खेळू शकेल. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला मयंक यादव रिटेन करून पश्चाताप करण्याची वेळ आहे. 11 कोटी रुपये मोजून त्याला कायम ठेवलं होतं. आता त्याच्याबाबत काही कन्फर्म नसल्याने बदली खेळाडूही घेता येत नाही.

4 / 5
लखनौ सुपरजायंट्स संघ: ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, आयुष बडोनी, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मिचेल मार्श, अवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुआल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रेट्झक, मयंक यादव. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

5 / 5
Follow us
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.