AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs SAW Final: भारतीय संघ आणि ट्रॉफी दरम्यान 20 वर्षांपासून नकोसा रेकॉर्ड, इतिहास बदलावा लागणार

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक पाऊल दूर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकताच भारताला जेतेपदाची चव चाखायला मिळणार आहे. पण भारतीय संघाला 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडावा लागणार आहे.

| Updated on: Nov 01, 2025 | 4:47 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 2 नोव्हेंबरला होणार असून जेतेपदापासून भारतीय संघ फक्त एक विजय दूर आहे. पण यासाठी गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेला नकोसा विक्रम मोडणं भाग आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. श्रीलंकेला पराभूत करत विजयी प्रवास सुरु केला होता. त्यानंतर पाकिस्तानला पराभूत केलं. पण दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 48.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाविश्वाला नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेला शेवटचं 2005 मध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. म्हणजेच 20 वर्षांपासून असंच सुरु आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीतही दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभवाची धूळ चारली होती.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
2005 नंतर दक्षिण अफ्रिकेने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सलग तीनदा पराभूत केलं आहे. यात या स्पर्धेतील साखळी सामन्याचा समावेश आहे.  त्यामुळे अंतिम सामन्यात पुन्हा दक्षिण अफ्रिका समोर असल्याने धाकधूक वाढली आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना खेलत आहे. 2005 आणि 2017 मध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?.
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?.
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?.