T20 मध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट, पहिल्या स्थानावर कोण?; तुफानी फलंदाजही टॉपमध्ये

एका सामन्यात बनलेला हिरो ठरलेला बॅटसमन सामन्यात शून्यावर बाद होतो. जो खेळाडू एका सामन्यात तुफानी फटकेबाजी करतो तो पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परततो. कोणत्याही फलंदाजाला शून्यावर बाद व्हायचं नसतं.

1/5
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.  एका सामन्यात बनलेला हिरो ठरलेला बॅटसमन सामन्यात शून्यावर बाद होतो. जो खेळाडू एका सामन्यात तुफानी फटकेबाजी करतो तो पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परततो. कोणत्याही फलंदाजाला शून्यावर बाद व्हायचं नसतं. मात्र, अनेकदा  फलंदाजाला बहुतेक वेळा शुन्यावर आऊट होतात.शून्यावर बाद होणे हे फलंदाजासाठी भयानक स्वप्नासारखं असतं. टी-20 क्रिडा प्रकारात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या खेळाडंविषयी जाणून घेणार आहेत.

2/5
सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणाऱ्या खेळांडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर टी-20 मधील सिक्सर किंग आहे.  ज्याच्या नावावर टी -20 ची सर्वोच्च धावसंख्या आहे असा वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेल आहे. गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह आयपीएलपासून ते सीपीएलपर्यंत या दमदार बॅटिंग केली आहे. ख्रिस गेल त्याच्या कारकिर्दीत एकूण 30 वेळा शून्यावर बाद झाला आहे. CPL-2021 च्या टायटल मॅचमध्ये गेल खाते न  उघडता आऊट झाला होता.गेलने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 446 टी -20 सामने खेळले आहेत.

3/5
दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिचच्या सुनील नरेनचे नाव आहे. नरेन टी -20 मध्ये 28 वेळा शून्यावर बाद झाला आहे. नरेन हा प्रामुख्यानं ऑफ स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु कधीकधी तो फलंदाजीही करतो.आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबत सुनील नरेननं डावाची सुरुवातही केली आहे. सीपीएलमध्येही नरेननं सलामीला बॅटिंग केली. नरेनने आतापर्यंत एकूण 373 टी -20 सामने खेळले आहेत.

4/5
नरेननंतर वेस्ट इंडिजचा आणखी एक क्रिकेटपटू आहे. त्याचे नाव लेंडल सिमन्स आहे. सिमन्स टी-20 क्रिकेटमध्ये नरेनच्या बरोबरीने 28 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 283 टी -20 सामने खेळले आहेत.

5/5
चौथ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ आहे. स्मिथ त्याच्या टी -20 कारकिर्दीत एकूण 28 वेळा बाद झाला आहे. स्मिथने 2017 मध्ये क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 337 टी -20 सामने खेळले आणि 7870 धावा केल्या. तो IPL, CPL, PSL सारख्या लीगमध्ये खेळतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI