मुंबईतील पवई परिसरात बेकायदा झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या BMC कर्मचारी आणि मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 5 पोलीस जखमी झाले आहेत.
1 / 5
अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असतानाच तेथील पोलिस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
2 / 5
दगडफेक केल्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्जही करण्यात आला. सध्या या घटनेनंतर पवई परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
3 / 5
हिरानंदानी भागात अनेक वर्ष जुनी झोपडपट्टी असून तेथील झोपडीधारकांना पालिकेने नोटीस देखील दिली होती. त्यामुळे आज पालिकेचे अनधिकृतरित्या वसलेली ही झोपडपट्टी हटवण्यासाठी कारवाई सुरू केली
4 / 5
या कारवाईमुळे रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवरती थेट दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला