PHOTO! तापसीची मालदीवमध्ये धमाल मज्जा….. ‘बीच लूक’ला चाहत्यांची पसंत
तापसीची मालदीवमध्ये धमाल मज्जा... 'बीच लूक'ला चाहत्यांची पसंती (Tapasi's fun in Maldives ... Fans love 'Beach Look' )
VN | Edited By: भीमराव गवळी |
Updated on: Oct 12, 2020 | 7:19 PM
Share
तापसी पन्नू इन्स्टाग्रामवर (instagram) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहे. रोज ती इन्स्टाग्रामवर काही तरी शेअर करत असते. मात्र, यात तिच्या बीच लूक'ला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे.
1 / 8
या फोटोत तापसी पन्नू स्विमींग पूलमध्ये डायट फूड घेऊन दिसत आहे. 'सुट्ट्यांमध्ये मज्जा करताना मी आहार तज्ज्ञांनी सांगितलेला डायट प्लॅनही पाळते' असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
2 / 8
तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक चांगलाच आवडला आहे. तापसीनं 9 ऑक्टोबरला केलेल्या पोस्टला तब्बल 7 लाखांपेक्षा अधिक लोकांनी खूप कमी वेळात लाइक केलं होतं.
3 / 8
या ट्रिपमध्ये तापसी तिच्या आहार तज्ज्ञांनी दिलेला डायट प्लॅन फॉलो करत आहे.
4 / 8
ज्यात ती अंडी आणि मशरुमसारखे प्रोटीन्स आणि फॅटस् घेत आहे. तिचा आगामी सिनेमा 'रश्मि रॉकेट' साठी ती वजन कमी करत आहे.
5 / 8
तापसी मालदीवमध्ये स्कूबा डायविंगचा आनंद लुटताना दिसली आहे.
6 / 8
आपल्या गँगसोबत तिनं स्कूबा डायविंगचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे.
7 / 8
मालदीवमध्ये मित्र- मैत्रिणींसोबतच तिची बहीण शगुन पन्नूही या ट्रीपमध्ये तिच्या सोबत आहे. बहिणीसोबतचा एक छान फोटोही तापसीनं शेअर केला आहे.