PHOTO | हिरड्यांच्या समस्येने त्रस्त लोकांना कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका 8 पट जास्त! संशोधकांचा दावा

हिरड्यांच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रूग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका 8.8 पट अधिक आहे. अशा रूग्णांना संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता सामान्य रूग्णांपेक्षा 3.5 पट जास्त आहे. हा दावा कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या संशोधनात केला आहे.

1/5
हिरड्यांच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रूग्णांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका 8.8 पट अधिक आहे. अशा रूग्णांना संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता सामान्य रूग्णांपेक्षा 3.5 पट जास्त आहे. हा दावा कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या संशोधनात केला आहे. संशोधकांच्या मते, जर हिरड्यांबद्दल काही समस्या असेल, तर अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास व्हेंटिलेटर सपोर्टची गरज 4.5 टक्के अधिक असते.
2/5
हिरड्यांच्या समस्या अधिक असल्यास आणखी काही आजार देखील संभवतात. अॅकॅडमी ऑफ जनरल डेंटिस्ट्रीचा असा दावा आहे की, सूज येणे, रक्तस्त्राव होणे आणि कमकुवत हिरड्या आपली हाडे कमकुवत करतात, ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. परिणाम लोक अधिक वृद्ध दिसू लागतात.
3/5
हिरड्यांच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका देखील 2 पट जास्त असतो. हृदयाच्या कार्य अनियमित होण्याचा धोका देखील जास्त असतो.
4/5
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जबड्याशी जोडलेली क्रेनियल नर्व रक्ताभिसरणांद्वारे तोंडातील विषाणू मज्जातंतूपर्यंत पोहोचतात आणि अल्झायमरचा धोका वाढवतात.
5/5
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये झालेल्या सार्वजनिक संशोधनात असे दिसून आले आहे की, हिरड्या-संबंधित आजार असलेल्या पुरुषांना स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता 33 टक्के जास्त आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI