Ramabai Ambedkar : भीमराव यांना ‘साहेब’ बनवण्यात रमाबाईची भूमिका महत्त्वपूर्ण ; आयुष्यभर जगल्या त्यागाचे जीवन

भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रामाबाईनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

May 27, 2022 | 11:31 AM
प्राजक्ता ढेकळे

|

May 27, 2022 | 11:31 AM

 भारताचे पहिले कायदेमंत्री व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक आव्हानांनी,संकटांनी भरले आयुष्य सर्वांनाच माहित आहे. अगदी लहानपणापासून सामोर आलेल्या अनेक आव्हानाचा सामना करत त्यांनी स्वतःला घडवले. डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांनीही त्यांची पावलोपावली साथ दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

1 / 5
 वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भीमराव आंबेडकर यांचे रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत लग्न झाले होते. डॉ. आंबेडकर यांनी आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक रमाबाई आंबेडकरांना समर्पित केले आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीपासून ते बाबासाहेब आंबेडकर बनण्यापर्यंतचे सर्व श्रेय रमाबाई यांना जाते. कारण प्रत्येक चांगल्या वाईट काळात ती माझ्या सोबत राहिली. रामाबाईंमुळेच आंबेडकर बाहेर जाऊन शिक्षणपूर्ण करू शकले.

2 / 5
रमाबाईना जीवन जगत असतांना अनेकदा लोकांच्या टोमण्याचा, टीकेचा सामना करावा लागला. रमाबाई आयुष्यात अनेक छोटी-मोठी कामे करत त्यांनी आपले कुटुंब चालवले. संसार सांभाळ केला. लग्नांनंतर रमाबाईना समजून चुकले होते की, दलित, ,मागास वर्गाची सुधारण शिक्षणाशिवाय शक्य नाही. या  लोकांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिक्षण करले, त्यासाठी भीमराव आंबेडकर यांनी शिक्षण घेणं आवश्यक आहे. जेणे करून ते सर्व समाजाला शिक्षणाच्या प्रती जागृत करू शकतील. हे लक्षात घेऊन रमाबाईनी अनेकदा भीमराव आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उभी करण्यासही हातभार लावला

3 / 5
7 फेब्रुवारी 1898 ला जन्मलेल्या रमाबाई यांचे आई-वडीलांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने रमाबाई यांच्या मामा-मामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच भीमराव आंबेडकर याच्या सोबत त्याचा विवाह लावून दिला. भीमराव आंबेडकर प्रेमाने रमाबाईंना 'रामू' या नावाने बोलावत. तर रमाबाई भीमराव यांना 'साहेब' या नावाने बोलवत असत. दलित समाजाच्या उद्धारासाठी रमाबाईंनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाना साथ दिली.

4 / 5
 जवळपास तीन दशके बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिल्यानंतर दीर्घ आजाराने रमाबाई यांचे निधन  झाले. आयुष्यभर त्यागाचे जीवन जगलेल्या रमाबाईंवरती अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटही बनवण्यात आले आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें