AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अरबाजच्या मृत्यूचा इतका खेद वाटला नसता”; असं का म्हणाले सलीम खान?

सलीम खान हे त्यांच्या तिन्ही मुलांसोबत 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. सोहैल खानच्या या चित्रपटात सलमान आणि अरबाज खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

| Updated on: Sep 01, 2024 | 4:11 PM
Share
कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिग्गज पटकथालेखक सलीम खान त्यांच्या तीन मुलांसोबत पोहोचले होते. सलमान, अरबाज आणि सोहैल खान यांच्यासोबत ते या शोमध्ये उपस्थित राहिले होते. या एपिसोडमध्ये सलीम खान यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटाविषयी मत मांडलं होतं.

1 / 5
सोहैल खानने हा चित्रपट बनवला होता आणि त्यात अरबाज, सलमान या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा सोहैलने वडील सलीम खान यांना तो चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला होता. याविषयी त्यांनी 'कपिल शर्मा'च्या शोमध्ये सांगितलं होतं.

2 / 5
सलीम खान यांनी म्हटलं होतं की चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यात भूमिकांची अदलाबदल करणं गरजेचं होतं. "या चित्रपटात मध्यांतराच्या आधीच सलमानच्या भूमिकेचा मृत्यू होतो. ही भूमिका खरंतर अरबाजने साकारायला पाहिजे होती."

3 / 5
"चित्रपटात जेव्हा सलमानचा मृत्यू दाखवला गेला, तेव्हाच थिएटरमधून अर्धा प्रेक्षकवर्ग बाहेर निघून गेला. अरबाजच्या भूमिकेचा मृत्यू दाखवला असता तर कदाचित त्यांची इतकी निराशा झाली नसती", असं सलीम खान म्हणाले.

4 / 5
'हॅलो ब्रदर' या चित्रपटात सलमान आणि अरबाज खानसोबतच राणी मुखर्जी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका होत्या. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आयुष्कलम' या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक होता. विशेष म्हणजे हा मल्याळम चित्रपटसुद्धा 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घोस्ट' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक होता.

5 / 5
Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश