Marathi News » Photo gallery » Triphala powder is made from three fruits, know the benefits of regular consumption
तीन फळांपासून बनते त्रिफळा चूर्ण, जाणून घ्या नियमित सेवनाचे फायदे
आवळा, बेहडा आणि हिरडा या तीन फळांपासून जे चूर्ण तयार होते, त्याला त्रिफळा चूर्ण असे म्हणतात. ज्यांना पोटाशी संबंधित काही विकार आहेत असे लोक त्रिफळा चूर्णाचे सेवन करतात. मात्र वास्तवात त्रिफळा चूर्ण हे पोटासह इतर समस्यांवर देखील रामबाण इलाज आहे. आज आपण त्रिफळा चूर्णाचे फायदे जाणून घेणार आहोत.
पोटाच्या समस्यांसाठी त्रिफळा वरदान मानले जाते. हे नैसर्गिकरित्या पोट साफ करते आणि डिटॉक्सिफाय करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ, उलट्या आणि आंबट ढेकर यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
1 / 5
जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!
2 / 5
रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा अनेक जण त्रिफळा चूर्णचे सेवन करतात. त्रिफळा चूर्ण नियमित घेतल्यास त्वचेचे आजार होत नाहीत. तसेच पचनशक्ती देखील वाढते. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ तरुण दिसते.
3 / 5
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर संसर्गाशी लढण्यास सक्षम बनते. श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे.
4 / 5
त्रिफळा चूर्ण हे सुजेवर देखील उत्तम उपाय आहे. तसेच ज्या लोकांना संधिवाताचा त्रास आहे. अशा लोकांनी नियमित त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. टीप वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.