AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे अवकाळीचा फटका, कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा

imd prediction: राज्यात ऊन आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यातील एका भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत रविवारी अवकाळी पाऊस झाला.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 01, 2024 | 1:33 PM
Share
कोल्हापूर उपनगरासह करवीर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. वळवाच्या आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी आठवडा बाजारात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले.

1 / 5
 करवीर तालुक्यातील चाफोडी गावात आठवडी बाजारातील शेतकऱ्यांचा साहित्य अक्षरशा वाहून गेले. साहित्य वाचवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची देखील कसरत सुरू होती. कोल्हापूर जवळील पाचगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिटं जोरदार पाऊस बरसला.

2 / 5
साताऱ्यातील पाटणमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासून रिमझिम पाऊस होता. या पावसामुळे कलिंगड, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पावसामुळे नुकसान झाले.

3 / 5
विदर्भात मंगळवारपासून (२ एप्रिल) काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने तापमान वाढणार आहे.  विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
रविवारी सोलापुरात राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, बीड, अकोला, चंद्रपूरमध्येही पारा चाळिशीपार गेला होता. राज्याच्या बहुतेक भागांत कमाल तापमानात घट झाली असली तरीही किमान तापमान २५ अंश सेल्सिअवर कायम आहे.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा