Urmila Matondkar | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे कूपर रुग्णालयात रक्तदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी रक्तदान केले

1/5
शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या. मुंबईतील कूपर रुग्णालयात उर्मिला मातोंडकर यांनी रक्तदान केलं.

2/5
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत जनतेला स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी रक्तदानाचा संकल्प केला.

3/5
 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत आयोजित रक्तदान शिबिरात उर्मिला सहभागी झाल्या. बाबासाहेबांना अभिवादन करुन त्यांनी रक्तदान केलं.

4/5
 रक्तदान शिबिरात सहभागी झालेले शिवसैनिक आणि रणरागिणींना उर्मिला मातोंडकर यांनी सलाम केला. शिवसेनेत आपला प्रवेश नवा असला तरी मला शिवसेना नवीन नाही, आणि लोकांनाही मी नवीन नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या.

5/5
कामाने बोलू शकतो ते शब्दाने बोलण्यात मजा नाही. रक्तदानापेक्षा समाजसेवेचं याहून दुसरं चांगलं कार्य नाही, अशा भावना उर्मिला मातोंडकर यांनी बोलून दाखवल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI