आपल्या मादक आणि मोहक अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच चर्चेत राहते. ती फक्त भारतीय कपड्यांमध्येच छान दिसते. विद्या बालनला पाश्चिमात्य कपडे चांगले दिसत नाहीत, असा एक प्रघात लोकांमध्ये आहे. याच मुद्द्याला घेऊन मागील काही दिवसांमध्ये तिने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये अशा प्रकारची समज असणाऱ्यांनी तिने चांगलेच उत्तर दिले होते. याच पार्श्वभूमीवर विद्या बालनचे आता नवे फोटो समोर आले आहेत. ती या फोटोमध्ये चक्क पाश्चिमात्त्य कपड्यामंध्ये दिसत आहे. पारंपरिक कपड्यांमध्येच विद्या बालन छान दिसते असा समज असणाऱ्यांसाठी विद्याचे हे फोटो म्हणचे चांगलीच चपराक असल्याचे म्हटले जात आहे.