By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
बिग बॉसच्या 7व्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयातनं बिग बॉसबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच बॉलिवूडबाबतही तिनं वक्तव्य केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोफिया हयातनं 'बिग बॉस' बघणं बंद करायला हवं,असं वक्तव्य केलं आहे.
बिग बॉसमध्ये झालेल्या सोफिया आणि अरमान कोहलीच्या भांडणानंतर सोफिया हयातनं बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. आता सध्या ती लंडनमध्ये मॉडेलिंग करत आहे .
बिग बॉसमधून फक्त हिंसा पसरवली जाते आणि जास्त हिंसा करतो तोच बिग बॉसच्या घरात जास्त काळ टिकतो, अशी घणाघाती टीका सोफियानं केली आहे.
एकच गोष्ट वारंवार दाखवून टीआरपी मिळवण्याचं काम बिग बॉस करतं, असंही सोफिया म्हणाली.
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवरही सोफियानं वक्तव्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये घाण भरली असल्याचं तिनं म्हटलंय. अनेकदा पार्टीनंतर निर्मात्याने रुममध्ये बोलवल्याचा आरोपही तिने केलाय.
सोफियानं आपण स्वत: त्यावेळी ड्रग्जच्या आहारी गेलो असल्याचाही गौप्यस्फोट केला आहे. सोबतच बॉलिवूडच्या पार्टीमध्ये नेहमी ड्रग्ज असतं असंही ती म्हणाली .