Photo: भटकंती करायची आहे?, जपून! कोरोनामुळे ‘या’ देशांमध्ये प्रवासावर बंदी

आताही कोरोनाचे नवनवीन स्ट्रेन येत आहेत. स्वत:ला या संसर्गाच्या वाढत्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी बर्‍याच देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी त्यांचे दरवाजे बंद केले आहेत. (Want to wander ?, be careful! Corona bans travel to 'these' countries)

  • Publish Date - 11:28 am, Tue, 16 March 21
1/7
Travel
जगात कोरोनानं धडक देऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. बर्‍याच औषध कंपन्यांनी लस विकसित केली आहे, त्यानंतर अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्या आहेत मात्र तरीही परिस्थिती सामान्य झालेली नाहीये.
2/7
Travel
आताही कोरोनाचे नवनवीन स्ट्रेन येत आहेत. स्वत:ला या संसर्गाच्या वाढत्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी बर्‍याच देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी त्यांचे दरवाजे बंद केले आहेत. तरीही, काही देशांमध्ये कोरोनाचा नकारात्मक अहवाल दर्शविण्यावर प्रवेशास परवानगी आहे.
3/7
Travel
अनेक देशांनी काही निवडक देशांसाठी हे निर्बंध हटवले आहेत. ज्यांना येण्याची परवानगी आहे त्यांच्यासाठी काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. यात क्वारंटाईनमध्ये राहणं आणि कोरोना तपासणी अहवाल दाखवणं या मुख्य अटी आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या देशांबद्दल चर्चा करू, जिथे भारतीय आत्ता प्रवास करू शकत नाहीत.
4/7
Travel
जर तुम्ही आत्ताच कुठल्या देशाला भेट देण्याचं ठरवत असाल तर आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांबद्दल जाणून घ्या आणि इथे दिलेली माहिती वाचा. भारतीय आत्ता जपान, इंडोनेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशिया, फिलीपिन्स, तैवान आणि थायलंडमध्ये जाऊ शकत नाहीत.
5/7
Travel
त्याशिवाय अफगाणिस्तान, व्हिएतनाम, बहरीन, भूतान, ब्रुनेई दारुसलाम, इराक, इस्त्राईल, कझाकस्तान, कुवैत, किर्गिस्तान, लाओस, उत्तर कोरिया, मंगोलिया, म्यानमार, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि येमेन. भारतीय याठिकाणीसुद्ध प्रवास करू शकत नाहीत.
6/7
Travel
युरोपियन देशांबद्दल बोलायचं झालं तर भारतीय आता फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, ग्रीस, हंगेरी, आईसलँड, लाटविया, लक्झेंबर्ग, लिथुआनिया, माल्टा, नॉर्वे, पोलंड, रोमानिया, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीत.
7/7
Travel
उत्तर अमेरिकन देशांमध्ये अल्जेरिया, मध्य आफ्रिकेतील देशांमधील अंगोला, पूर्व आफ्रिकी देशांमधील लिबिया, मेडागास्कर, मॉरिशस आणि मोरोक्कोमधील उत्तर आफ्रिकी देशांमध्ये (आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल चेकलिस्ट इंडिया) प्रवास करण्यास बंदी आहे. म्हणजेच या देशांमध्ये सध्या भारतीय प्रवासी जाऊ शकत नाहीत.