एक लाख वेळा धकधक करुनही हृदय थकत नाही! असं कसं काय? कारण तर जाणून घ्यावंच लागेल

Tire: मानवी हृदय नियमितपणे 2000 गॅलन रक्ताचे पंपिंग करत असतो.एक सामान्य व्यक्तीचे हृदय एका दिवसात 1 लाख वेळा धडधड करत असते परंतु हृदय एवढे काम करून सुद्धा थकत का नाही?काय नेमके कारण आहे त्यामागे..

Jan 24, 2022 | 6:06 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 24, 2022 | 6:06 PM

मानवाचे हृदय कधीच थकत का नाही ? कधी असा विचार कधी केला आहे का?  याचे उत्तर जाणून घेण्याआधी एक गोष्ट आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की, हृदय (Heart) किती काम करते?  वेब एमडी यांच्या रिपोर्ट नुसार मानवी हृदय नियमितपणे 2000 गॅलेन  रक्ताचे पंपिंग (blood pumping) करते तसेच एका सामान्य व्यक्तीचे हृदय एका दिवसात 1 लाख वेळा धडधड करत असते. आता आपण जाणून घेऊया आपले हृदय एवढे काम केल्यानंतर सुद्धा थकत (tire) का नाही?

1 / 5
बीबीसीच्या साइंस फोकस मॅगझिनच्या रिपोर्टनुसार मानवी शरीरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मांस पेशी साधारणपणे एका विशिष्ट वेळेनंतर थकून जातात. आणि याचा अनुभव व्यक्तीला सुद्धा येतो कारण की जेव्हा मांस पेशी थकतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये थकवा ,अशक्तपणा जाणवत असतो परंतु हे सगळे हृदयाच्या बाबतीत घडत नाही. आपले हृदय हे  कार्डियोमसल्‍स पासून बनलेले आहे. हे एका विशिष्ट प्रकारच्या मांस पेशी असतात.

2 / 5
कार्डियो मसल्‍स विशेष प्रकारच्या कोशिका म्हणजे पेशी कार्डियोमेयासाइट्सशी मिळून बनलेल्या असतात यांची विशेष बाब म्हणजे की , यांच्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा अजिबात भारी पडत नाही म्हणजे यांना कोणत्या प्रकारचा थकवा जाणवत नाही. दुसऱ्या पेशी प्रमाणे यांना माइटोकॉन्‍ड्र‍िया द्वारे ऊर्जा मिळत राहते. माइटोकॉन्‍ड्र‍िया याला पावर हाउस सुद्धा म्हटले जाते कारण की हे शरीरातील कोशिकांना म्हणजे वेगवेगळ्या पेशींना ऊर्जा देण्याचे कार्य करते.

3 / 5
दुसऱ्या अन्य मांसपेशीच्या तुलनेमध्ये कार्डियोमेयाेसाइट्स रक्तपुरवठा होण्याच्या प्रक्रियेला चांगले करण्याचे काम करत असतो.या कारणामुळे आपले हृदय  न थकता काम करते आता जाणून घेऊया हृदयासंबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या खूप जणांना माहिती नसतात. अमेरिकन मेडिकल एसोस‍िएशन याच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त हृदयविकाराचा धोका सोमवारच्या दिवशी सकाळी उद्भवण्याची शक्यता असते.

4 / 5
अमेरिकन मेडिकल एसोस‍िएशन यांच्या रिपोर्टनुसार थंडीमध्ये हृदय विकाराची सुरुवात ख्रीसमस पासून होते. संशोधनातून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे म्हणूनच आपल्या हृदयाची नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे. नियमितपणे कमीत कमी अर्धा तास व्यायाम करायला हवा. मसालेदार पदार्थ ,तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खायला पाहिजेत तसेच जे काही जंक फास्टफूड आहेत त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात करू नका, या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें