Rajyasabha Election | विजयानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचा जल्लोष

Rajyasabha Election | विजयानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांचा जल्लोष

| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 2:43 PM

देवेंद्र फडणवीसांची खेळी इथे यशस्वी ठरली. भाजप नेत्यांचा त्यामुळे मोठा जल्लोष विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील बघायला मिळाला. आमच्या सगळ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे.

महाविकास आघाडी आणि सर्मथक आमदारांची एकूण सहाहून जास्त मतं भाजपसाठी फुटली. देवेंद्र फडणवीसांची खेळी इथे यशस्वी ठरली. भाजप नेत्यांचा त्यामुळे मोठा जल्लोष विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील बघायला मिळाला. आमच्या सगळ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार येथे निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सर्वात पहिला हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांना सर्मपित केला आहे. आजचा विजय सर्वार्थाने महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे. संजय राऊतांपेक्षा ही जास्त मतं घेतलेली आहेत. पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या क्रमांकावर निवडून आले. धनजंय म्हाडिकांना त्याठिकाणी 41.56 मतं मिळाली. जी शिवसेनेचे ऑफिशल उमेदवार संजय राऊत यांच्या पेक्षा जास्त आहेत.

Published on: Jun 11, 2022 02:42 PM