Maharashtra Political Crisis : सरकार पडल्यानंतर केलेल्या भाजपच्या जल्लोषावर बंडखोरांचा आक्षेप? दीपक केसरकरांचं मोठं विधान!

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष दिसून आला. मात्र या जल्लोषावर आता बंडखोर आमदारांनी अक्षेप घेतला आहे.

Maharashtra Political Crisis : सरकार पडल्यानंतर केलेल्या भाजपच्या जल्लोषावर बंडखोरांचा आक्षेप? दीपक केसरकरांचं मोठं विधान!
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
अजय देशपांडे

|

Jun 30, 2022 | 8:42 AM

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या (BJP) गोटात मात्र जल्लोष दिसून आला. या जल्लोषावर बंडखोर आमदार दीपक केसरक यांनी अक्षेप घेतला आहे. अशा पद्धतीने जल्लोष करणे योग्य नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. आम्ही हे बंड सत्तेसाठी केलेलं नाही. मात्र पक्षाचा जो मुळ विचार आहे तो मागे पडता कामा नये असे आम्हाला वाटत असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जो जल्लोष झाला, तो अयोग्य असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. भाजपाच्या गोटात जो काही जल्लोष झाला, ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यामुळे आम्ही दुखावलो गेलो असल्याची भावना केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले केसरकर?

मी खरं सांगतो आम्ही सत्तेसाठी बंडखोरी केलेली नाही. मंत्रिपदं असणारी लोकं कशाला बंड करतील? सरकार येतात जातात मात्र विचार टिकवायचा असतो, या भावनेतून हे सर्व घडले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे. उद्धव  ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जो जल्लोष झाला त्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. नेत्यांनी बोलताना, प्रतिक्रिया देताना भान बाळगले पाहिजे. बोलण्यासाठी पक्षांनी जे काही अधिकृत प्रवक्ते नेमले आहेत त्यांनीच प्रतिक्रिया देणे अपेक्षीत आहे. कोणाचीही मनं दुखावायची नाहीत हे तत्त्व जसे आम्ही पाळतो तसे ते तुम्ही देखील पाळावे असे  केसरकर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भावनांची कदर ठेवली पाहिजे

पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटले आहे की, सत्ता स्थापन होणारच आहे. ती कधी होणार ते शिंदे किंवा फडणवीस साहेब सांगतील. शिंदे साहेब सगळ्यांना विचारुनच मग निर्णय घेतात. याचं खरंच कौतुक आहे. आम्हाला सत्ता स्थापना करताता आमच्या नेत्याला दुखवायचं नाही. भावनांची कदर ठेवली पाहिजे. शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा विचार येतो, ठाकरेंशी असलेलील बांधिलकी येते, प्रत्येक गोष्ट येते. त्यामुळे हा जल्लोष अयोग्य आहे. केवळ प्रवक्त्यांनीच आपली भूमिका मांडावी.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें