AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मी मंत्री असेन”

शिवसेना भाजप युतीचे सरकार येईल आणि त्यात मी मंत्री असेन," असा दावा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला (babanrao lonikar on bjp shivsena government formation) आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मी मंत्री असेन
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 03, 2019 | 8:07 AM
Share

जालना : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खूप चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकांदरम्यान ते एकत्र बसले आणि एका तासात युती (babanrao lonikar on bjp shivsena government formation) झाली. त्यामुळे आताही येत्या एक दोन दिवसात सर्व वातावरण निवळून जाईल. 1000 टक्के शिवसेना भाजप युतीचे सरकार येईल आणि त्यात मी मंत्री असेन,” असा दावा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. जालन्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले असताना (babanrao lonikar on bjp shivsena government formation) त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यासारख्या भाजप-शिवसेनेच्या दिवंगत नेत्यांनी 35 वर्षापूर्वी युती केली होती. शिवसेना हा मित्रपक्ष आहे,” असेही लोणीकर म्हणाले.

लोकांनी भाजप शिवसेना युतीला जनाधार दिलेला आहे. भाजपकडे 120 आमदार आहेत. तर शिवसेनेकडे 60 आमदार आहेत. शिवसेना-भाजप युतीचं सरकार यावं अशी 11 कोटी जनतेची इच्छा आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी त्यात विष कालवते आहे. अन्नामध्ये मीठं कालवतं असल्याचा आरोपही लोणीकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केला (babanrao lonikar on bjp shivsena government formation) आहे.

“आमच्या खेड्याकडे एक म्हण आहे, शिक्याचा पाय तुटला आणि मांजरीचं पांग फिटलं. पण इथे शिक्याचा पाय तुटणार नाही आणि मांजरीचे पांगही फिटणार नाही,” असेही लोणीकर म्हणाले.

“काँग्रेस राष्ट्रवादीने आमच्या मित्रपक्षाला पाठींबा देण्याचं प्रश्नच उरत नसल्याचं बबनराव लोणीकर म्हटलं. त्यांच्या पायावर ते कुऱ्हाड हाणून घेणार धोंडा पाडून घेणार नाही, असं देखील म्हणायला विसरले नाहीत. शिवसेनेची आणि भाजपाची विचारधारा हिंदुत्व आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी असल्याचं लोणीकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठींबा देणे अशक्य आहे, असा दावा लोणीकरांनी (babanrao lonikar on bjp shivsena government formation) केला आहे.”

जालन्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, “माझा बळीराजा संकटात आहे. त्यामुळे मी मुंबईत थांबून काय करणार. या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. तानाजी मालुसरे यांनी सांगितल्याप्रमाणे, आधी लगीन कोंढाण्याचे म्हणजे अगोदर माझा शेतकरी यांना मदत मिळवून देणे. माझे पहिल्या यादीत नाव आहे का? दुसऱ्या यादीत हे मला माहीत नाही. पण मी यादीत आहे हे मला नक्की माहीत आहे असेही त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हटलं आहे.”

संबंधित बातम्या :

“शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, सरकारमध्ये आहात सूचना काय देता, अंमलबजावणी करा”

चर्चा शिवसेनेनं थांबवली, आता त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू: माधव भांडारी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...