Marathi News » Spiritual adhyatmik » Chanakya niti for Marriage According to Chanakya niti marriage with such women should not be done by mistake
Chanakya niti for Marriage: चाणाक्य नीतीनुसार अशा प्रकारच्या स्त्रियांशी चुकूनही करू नये विवाह
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. प्रत्येकाला असे वाटते की, आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिला तो प्रेम आणि सर्वस्व देऊ शकेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देईल. सुख दुःखात आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील. जर तुम्हीही आयुष्याचा जोडीदार निवडण्याची तयारी करत असाल तर आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी.
वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्। रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।। वरील श्लोकानुसार, आचार्य चाणाक्य सांगतात की, विवाहापूर्वी जोडीदाराची निवड करताना व्यक्तीने शरीराऐवजी गुणांकडे पाहिले पाहिजे. शारीरिक आकर्षण हे काही काळाने कमी होते मात्र अंगी असलेले गुण हे कायम टिकून असतात.
1 / 4
चाणक्य नीतिनुसार पुरुषांनी सुंदर स्त्रियांच्या मागे धावू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नी सद्गुणी असेल तर ती प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंब सांभाळते. आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रीला बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक असावे.
2 / 4
चाणक्य नीतीनुसार धर्म-कर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मर्यादित असते. त्यामुळे त्यांची धर्म-कर्मावर किती श्रद्धा आहे, हे लग्नाआधी जाणून घेतले पाहिजे.
3 / 4
क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य यांच्या मते, जी स्त्री खूप रागीट असते ती कुटुंबाला कधीच सुखी ठेवू शकत नाही. याशिवाय ज्या स्त्रीने स्वतःच्या इच्छेने लग्न केले नाही अशा स्त्रीशी कधीही लग्न करू नये, अशी स्त्री तुम्हाला कधीही आनंदी ठेवू शकत नाही किंवा आदर देऊ शकत नाही.