आधुनिक ते ऐतिहासिक शस्त्रांपर्यंत…राज्यभरात दिमाखात साजरा होतोय शस्त्रपूजन सोहळा

आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आधुनिक ते ऐतिहासिक शस्त्रांचा राज्यभरात दिमाखात शस्त्रपूजन सोहळा साजरा होतोय. चला तर मग पाहूया फोटो.

1/5
विजयादशमीचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरातील नारीशक्तीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शस्रपुजन केले.नवरात्रीच्या नव दिवस भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत चौंडेश्वरी देवी मातेला पुजन करीत व विविध धार्मिक मंदिरात दुर्गामाता परीक्रमन करीत हिंदू संस्कृती ची जनजागृती केली व महिला सशक्ती करणाचा नारा व  विघातक शक्ती चा नाश व्हावा व महिलांनी स्वतः चे आत्मरक्षण  करावे जनजागृती करण्यात आली. व आज विजयादशमीच्या औचित्याने समापन करण्यात आला.

2/5
नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील शस्रागारात,पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शस्रपूजन केलं.कायदा आणी सुव्यवस्था राखतांना, अनेक वेळा पोलीस दलाची चांगलीच तारांबळ उडते.कारण गुन्ह्यांच्या प्रकारात आलेली विविधता. बऱ्याच वेळा तर आधुनिक शस्रांचा वापर गुन्हेगार करतात.त्यातच सायबर गुन्ह्यात झालेली वाढ.

3/5
फक्त बळाचाच नाही तर तंत्रज्ञान सुद्धा या युगात एक शस्र झालंय. याचमुळं पोलीस दलाचाही,आधुनिकतेकडे झपाट्यानं प्रवास सुरु झालाय. आज झालेल्या शस्रपूजनात पारंपरिक आणी आधुनिक या शस्रांचं, नाशिकच्या आयुक्तालयात करण्यात आलं.

4/5
दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रक्षकांशी संवाद साधला.

5/5
नांदेडमध्ये कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन केलय. दसऱ्याच्या निम्मिताने शहरात रैली काढत आरएसएसने विजयादशमीचा सण साजरा केलाय. ढोल ताशाच्या आवाजात शिस्तबद्ध रीतीने काढलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन करत आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी झेंडावंदन केलय, यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI