पुण्याचा मानाचा कसबा आणि दगडूशेठ गणपती थाटात विराजमान

पुण्याचा मानाचा कसबा आणि दगडूशेठ गणपती थाटात विराजमान

| Updated on: Aug 27, 2025 | 11:50 AM

पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपती आणि दगडूशेट हलवाईच्या गणपतीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु आहे.पुणेकर गणेशाच्या भक्तीरसात अगदी रंगून गेले आहेत.

राज्यासह संपूर्ण देशात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे. पुण्याचा गणेशोत्सवाला आगळे महत्व आहे. येथील मानाचा पहिला कसबा गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आहे. या दोन्ही गणपतींची आरस पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. या गणपतींची वाजत गाजत पालखीतून मिरवणूक निघाली आणि त्यांना आता मंडपात स्थानापन्न करण्यात येऊन त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदाचे १३३ वे वर्षे आहे.यंदा येथे केरळच्या पद्मनाभन मंदीराचा देखावा साकारण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत दगडूशेठ हलवाईचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर नेहमीचे कार्यक्रम होणार आहेत.

Published on: Aug 27, 2025 11:20 AM