Marathi News » Spiritual adhyatmik » People who are facing the wrath of Pitru Dosh should do these works daily they will get freedom from all the troubles know more
पितृदोषाच्या प्रकोपाचा सामना करताय, मग हे उपाय करा, मिळेल सर्व संकटांपासून मुक्ती
कुंडलीत पितृदोष असल्यास व्यक्तीला जीवन अनेक संकटे येतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य संकटांनी भरून जाते. अशा वेळी संकटमोचक हनुमानाची पूजा केल्यास खूप फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय.
हनुमान चालिसामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्याची क्षमता आहे. पितृदोष संपवण्याची प्रार्थना करत हनुमानासमोर नियमितपणे या चालिसाचा पाठ केल्यास तुमची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल.
1 / 4
बजरंग बाणाचे पठण सर्व प्रकारचे दुःख दूर होते अशी मान्यता आहे. हनुमानजींसमोर नियमितपणे हा पठण करुन झाल्यानंतर गूळ आणि चणे अर्पण करा. तसेच पितृदोषाचे सर्व संकट दूर करण्यासाठी त्याला प्रार्थना करावी.
2 / 4
हनुमानजी हे भगवान श्री राम आणि माता सीतेचे सर्वात मोठे भक्त आहेत. म्हणून प्रभू श्री राम आणि माता सीता यांचे संकीर्तन नियमितपणे करा. त्यामुळे तुमचे दुःख दूर होण्यास मदत होईल.
3 / 4
रामचरित्राचे पठण करा यामुळे तुमचा त्रास दूर होईल. जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवार आणि शनिवारी तरी करा. सुंदरकांड हा ग्रंथ भगवान हनुमान आणि श्री राम या दोघांनाही प्रिय आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या थोड्याच वेळात दूर होतील.